नुकत्याच काही दिवसापूर्वी भारतीय हवामान खात्याने पावसासंबंधी एक वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे आगमन लवकरच होणार आहे. यामुळे निश्चितचं महाराष्ट्रातील जनतेला विशेषता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाची बातमी : आता उसापासून तयार होणार जाम !
मात्र असे असले तरी राज्यात सर्वत्र वाढत्या तापमानामुळे लोक हैराण झाले आहेत. आगामी काही दिवसात तापमानात अजून वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे राज्यातील जनतेस तूर्तास तरी उष्णतेपासून आराम मिळणार नसल्याचे चित्र बघायला मिळते आहे. हवामान विभागाने सांगितले की, विदर्भात आजपासून अकरा मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात वादळाची परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र या वादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही असा अंदाज वर्तवला आहे. याउलट महाराष्ट्रात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे आसानी चक्रवादळ महाराष्ट्रात कुठलाच विपरीत परिणाम घडवणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता मे महिन्यात ?
विदर्भात तापमान 45 अंश सेल्शिअसच्या दरम्यान पोहचले असून पुण्यातही तापमान 40 अंश सेल्शिअस तापमान नोंदवले जातं आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ होत आहे शिवाय विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनता उकाड्याने अक्षरशः हैराण झाली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळचे संकट घोंगावत आहे. रविवारी अर्थात आज सायंकाळ पर्यंत याची तीव्रता वाढणार आहे. हवामान खात्यानुसार हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या असानी चक्रीवादळात वाऱ्याचा वेग हा ताशी 75 किलोमीटर राहणार असा अंदाज आहे.
हे नक्की वाचा : देशात विद्राव्य खतांची टंचाई : दर वाढले
यामुळे मच्छीमारांनी यादरम्यान बंगालच्या उपसागरात आणि आग्नेय समुद्रकिनारी जाऊ नये, असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. याशिवाय समुद्र किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्काली यंत्रणांही तैनात करण्यात आल्या आहेत. एकंदरीत या वादळाचा महाराष्ट्रवर काहीच विपरीत परिणाम होणार नाही. मात्र आगामी काही दिवस उष्णतेची लाट येणार असल्याने जनतेला उकाड्यापासून अजूनच त्रास सहन करावा लागणार आहे.
आनंदाची बातमी : उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1