राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक वातारण तयार होत असून, उन्हाचा चटका काही प्रमाणात कमी झाला आहे. गेल्या काही दिवसात बंद झालेली हवा आता वाहू लागली आहे. आज (दि. 5) राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह वादळी तर काही ठिकाणी विजेच्या गडगडासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
ब्रेकिंग : नक्की मान्सून महाराष्ट्रात कधी ?
लवकरच मान्सून राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळे पूर्वमोसमी पावसाचा काळ सुरू झाला आहे. तसे पोषक वातारण निर्माण झाले आहे. राज्यातील कामल तापमानात झपाट्याने चढ-उतारही होऊ लागले आहे. आज राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जना विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वादळी पाऊसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, व कोल्हापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात वादळी पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हे नक्की वाचा : या योजनेत सहभागी व्हा ; मिळतील एकरी 50 हजार
दरम्यान राज्यात रविवारी (दि. 4) सकाळपर्यंतच्या 24 तासात विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. तर अमरावती, ब्रह्मपूरी, अकोला आणि वर्धा येथील तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदले गेले आहे. उर्वरीत राज्यात अनेक ठिकाणी तापमान 35 ते 43 अंशाच्या दरम्यान नोंदले गेले आहे.
दरम्यान, अरबी समुद्राच्या आग्नेय भागात आज (दि. 5) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवारपर्यंत (दि. 7) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणाली पासून तामिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, आज (दि. 5) राज्यात उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सून अपडेट्स : जूनमध्ये मान्सून पाठ फिरवणार
मान्सूनबाबत हवामान विभागाने नवा अंदाज वर्तवला आहे. येत्या 11 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक सुनिल कांबळे यांनी वर्तवली आहे. केरळमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून सेट होईल, त्यानंतर मुंबईत आकारा तारखेच्या जवळपास मान्सून दाखल होऊ शकतो असं सुनिल कांबळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, येत्या आठवड्यात तापमानात नॉर्मलपेक्षा 1-2 डिग्रीची वाढ होऊ शकते. त्यामुळे उन्ह जास्त जाणवेल. साधारणपणे या महिन्यात उष्णता एक डिग्रीने जास्तच राहणार असल्याची माहिती देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
धक्कादायक : पाच वर्षात तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढणार ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1