चक्रीवादळामुळे तळ कोकणात रखडलेला मान्सून आता लवकरच वेग घेणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून राज्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, यंदा मान्सून दाखल होण्याचे ठिकाण बदलण्याचे संकेत असून, यंदा मान्सून विदर्भात चंद्रपूरमार्गे दाखल होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गुडन्यूज : नक्की दोन दिवसात धो धो
चक्रीवादळ पुढे सरकल्याने मोकळा झालेला मार्ग व मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीला निर्माण झालेले पोषक वातारण, यामुळे आता रखडलेला मान्सून वेग घेत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून राज्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या नैऋत्य मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग काही काळासाठी मंदावला. दुसरीकडे पूर्वेकडील वाऱ्यांची गती नियमित होती. त्यामुळे यंदा मान्सून चंद्रपूरमार्गे विदर्भात लवकर शिरण्याची शक्यता असल्याचे मत काही हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, पुणे येथील भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची दाट शक्यता आहे. तर 24 ते 25 जूनपासून पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. काल बुधवारी संध्याकाळी नागपूर शहरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे.
महत्त्वाची बातमी : ऊसदरासाठी स्वाभिमानीचे 1 जुलैपासून आंदोलन
बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासावर परिणाम झाला. दरवर्षी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. केरळमध्ये यंदा मान्सून 8 जून रोजी दाखल झाला. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात मान्सून 11 जून रोजी पोहोचला. त्यानंतर मात्र, मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक लागला. यामध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा देखील परिणाम कारणीभूत असल्याचे हवामान विभागाच्या तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
मान्सूनचे आगमन रखडल्याने राज्यापुढे पाणी संकट आणि शेतकऱ्यांसमोर खरिपाची पेरणी कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. मान्सूनचा पाऊस न झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लगाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने उद्यापासून दक्षिण कोकणात मान्सून सक्रीय होईल, असे सांगितलेले आहे.
मोठी घोषणा : ऊसतोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी
https://www.facebook.com/shetimitramagazine03