गाव पातळीवरील कृषी सहकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना अल्प मुदती सोबतच मध्यम आणि दीर्घ मुदतीचा पतपुरवठा करता येईल काय ? याबाबत सरकारच्या पातळीवर धोरणात्मक विचार सुरू आहे. तसेच येणाऱ्या दोन महिन्यात बियाणे संवर्धन तसेच जैविक उत्पादनांचे विपणन आणि प्रमाणीकरणासाठी बहुराज्यीय सहकारी संस्था स्थापन केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या संमेलनात गुरुवारी केली.
ब्रेकिंग न्यूज : आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना !
सहकार चळवळीला पुढे नेण्यासाठी एक निश्चित दिशा आणि धोरण आवश्यक असल्याचे सांगून अमित शहा म्हणाले, सहकार क्षेत्राच्या विकासासाठी टीम इंडियाच्या भावनेतून सगळ्यांना काम करावे लागणार आहे. मोदी सरकारच्या सहकार धोरणांमध्ये संगणकीकरण, निशुल्क नोंदणी तसेच लोकशाही पद्धतीने निवडणूक, सक्रिय सदस्यता, कामकाजात तसेच नेतृत्वामध्ये व्यावसायिकपणा, पारदर्शकता जबाबदारी यावर भर दिला जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग : सोमवारीपासून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत : कृषीमंत्री सत्तार
कृषी सहकारी सोसायट्या या बहुउद्देशीय बनवण्याची गरज असल्याचे सांगून ते पुढे बोलताना म्हणाले, कृषी सहकारी सोसायट्या नसलेली गावे शोधण्यात यावीत. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये देशातील कृषी सहकारी सोसायट्यांची संख्या तीन लाखांवर नेण्याचा सहकार मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महा ब्रेकिंग न्यूज : अखेर ठरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1