ब्रेकिंग : कांदा उत्पादकांना मिळणार अनुदान !

0
508

राज्यात कांदा प्रश्नावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन सभागृहातही विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येत आहेत. तसेच राज्यात विविध ठिकाणी कांद्याच्या दरावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार या प्रश्नावर मार्ग काढण्याच्या तयारीत आहे. कांद्याला प्रती क्विंटल 200 की 500 रुपयाचे अनुदान द्यायचे यावर चर्चा सुरु असून, कांदा उत्पादक शेतकऱ्याला पुढच्या आठवड्यात राज्य सरकार दिलासा देण्याची शक्यता आहे.

आनंदाची बातमी : आता ‘डीएपी’ मिळणार निम्म्याहून कमी किमतीत

बुधवारपासून सभागृहाचे कामकाज सुरु होणार असल्याने पहिल्याच दिवशी कांद्याच्या अनुदानाबाबत बुधवारी घोषणा होण्याची शक्यता आहे. कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने समितीही गठित केली आहे. या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रत्येकी प्रती क्विंटल दोनशे रुपये किंवा पाचशे रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.

विधीमंडळाच्या अधिवेशनात कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितले आहे. बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे सुरु करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

खूशखबर : उन्हाळी हंगामातही आता गव्हाची शेती शक्य : गव्हाचा नवा वाण विकसित

नाशिक जिल्ह्यातील कांद्याला भाव मिळत नसल्याने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरु झाली. मात्र बाजार समितीच्या व्यतिरिक्त फ्रार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कांदा खरेदी होत आहे. खरेदी करतानाचे निकष आणि परताव्याची प्रकिया क्लिष्ट असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद  मिळत नाही. आतापर्यंत 30 केंद्राच्या माध्यमातून खरेदी सुरु असून साधारणपणे 1 हजार 600 ते 1 हजार 800 टन कांदा खरेदी झाल्याची माहिती नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

कांद्याची प्रतवारी ठरवण्यात आली आहे, 45 ते 55 मिलिमीटर आकाराचा कांदा असावा, त्यासह रंग उडालेला नसावा. लाल रंग असावा. कांद्याला विळा लागलेला नसावा, आकार बिघडलेला, पत्ती गेलेला कोंब फुटलेला कांदा नसावा, असे निकष लावण्यात आले आहे. त्याबरोबरच आधार कार्ड पॅन कार्ड, बँक पासबुक, 7/12 खरीप हंगाम पीक पेरा असावा असे असंख्य नियम घालून देण्यात आले आहेत.

शिवाय कांद्याची विक्री केल्यानंतर साधारणपणे 8 दिवसांनी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. बाजार समितीत चांगल्या कांद्याला जो जास्तीत जास्त भाव मिळतो त्यापेक्षा केवळ शंभर दीडशे जास्त भाव दिला जात आहे. मात्र, कांदा वर्गीकरण, मजुरी हा खर्चही वाढत असून पैसे यायला 8 दिवस थांबावे लागत आहे. नाफेडने कमीत कमी 1 हजार 200 ते 1 हजार 300 रुपये भाव दिला असता तर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या असत्या अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

मोठी बातमी : कांदा उत्पादकाच्या आडचणीत वाढ : दराची घसरण सुरूच

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here