दुधाळ जनावराच्या आहारामध्ये मुख्य पोषक तत्वे आणि त्यांचे विभिन्न स्रोत गरजेचे असते. इतर जनावराप्रमाने दुधाळ पशुमध्ये सुद्धा पाच पोषक तत्वे उर्जा, प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्वे आणि पाण्याची गरज असते. हे सर्व पोषक तत्वे आहारामधून प्राप्त होत असतात. त्यामुळे आहारातून या सर्व घटकाची पुर्तता होईल, याची खातरजमा करावी जेणेकरून शरीरवाढ, गाभणकाळ व दूध उत्पादन योग्य रीतीने घेता येईल.
महत्त्वाच्या टिप्स : असा लावा बरसीम घास
जनावराच्या आहारामध्ये खुराक व हिरवा किव्हा वाळलेला चारा (भूसा, कड़बा किंवा कुटार) असे दोन मुख्य प्रकार पडतात. खुराक हा वेगवेगळ्या खाद्य घटकापासून ज्यामध्ये प्रामुख्याने धान्य, तेलबियांची ढेप, दाळीच्या चुनी, कृषि-औद्योगिक उपउत्पादने, खनिज पदार्थ आणि जीवनसत्वे याना योग्य प्रमाणामध्ये मिसळवून तयार केला जातो. हा खुराक सर्व पोषण मुल्ये प्रामुख्याने उपलब्ध करून देणारा एक मुख्य स्त्रोत आहे.
खुराक वासरासाठी, दुधाळ तसेच गाभण जनावरासाठी आणि वळूसाठी संतुलित पोषक आहार पुरवठा करण्याचे काम करते आणि त्यांचे योग्य प्रमाण अधिक उत्पादनासाठी ठरवणे गरजेचे आहे.
गाईसाठी सरासरी 400 किलोग्रॅम खुराकाची गरज असते. शरीर चलनासाठी 1.5 ते 2 किलोग्राम, दूध उत्पादनासाठी (अतिरिक्त) 400 ग्राम/प्रती लिटर तर गाभण जनारांसाठी (शेवटचे दोन महिने/अतिरिक्त) 1.5 किलोग्रम खुराक गरजेचा असतो. तर म्हशीसाठी सरासरी 500 किलोग्रॅम खुराकाची गरज असते. शरीर चलनासाठी 2 ते 2.5 किलोग्राम, दूध उत्पादनासाठी (अतिरिक्त) 500 ग्राम/प्रती लिटर तर गाभण जनारांसाठी (शेवटचे दोन महिने/अतिरिक्त) 2.5 किलोग्रम खुराक गरजेचा असतो.
नक्की वाचा : समजून घ्या, संकरित नेपिअर गवत उत्पादनाचे तंत्रज्ञान
कमी दूध उत्पादन असणाऱ्या जनावराला सहसा खुराक दिला जात नाही. त्याना फ़क्त कुटार किंवा थोड्या प्रमाणात हिरवा चारा दिला जातो. त्यामुळे खनिज पदार्थाच्या कमतरतेची शक्यता वाढते. अशा जनावरांना दररोज 50 ग्राम खनिज मिश्रण अवश्य दिला पाहिजे.
खुराक तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्य घटकाचे प्रमुख पाच प्रकार पडतात. 100 किलो खुराक तयार करण्यासाठी त्यांचे विभाजन पुढील प्रमाणे करता येतो.
1. धान्य (मका, ज्वारी, बाजरी) याचे प्रमाण 30 ते 40 % असावे. असे धान्य जनावरांच्या आहारामध्ये स्टार्चचा प्रमुख स्त्रोत आहे. स्टार्च जनावरांना उर्जा प्रदान करते.
2. तेलबियांची ढेप (सोयाबीन ढेप, सरकी ढेप, शेंगदाना ढेप) याचे प्रमाण 25 ते 35 % असावे. यामधील प्रथिन स्रोत हा जनावराच्या आहारामध्ये सर्वात महाग स्रोत आहे, म्हणून याचा प्रयोग आवश्यकतेनुसार करावा.
3. कृषि उपउत्पादने (दाळ चुनी, गव्हाचा किंवा भाताचा कोंडा) याचे प्रमाण 15 ते 30 % असावे. यामध्ये प्रथिनाचे प्रमाण धान्यापेक्षा जास्त पण तेलबिया ढेपा पेक्षा कमी असते. सामान्यत: यामध्ये फायबर आणि फोस्फोरसचे प्रमाण अधिक असते.
4. खनिज मिश्रणाचे प्रमाण 2 % असावे.
5. मीठाचे प्रमाण 1 % असावे.
महत्त्वाची माहिती : असा आसावा शेळ्यांचा आहार
खुराक तयार करताना वापरण्यात येणाऱ्या धान्य, तेलबियांची ढेप, आणि कृषि उपउत्पादने यांचे प्रमाण हे पशुंच्या शारीरिक स्थिती, अवस्था आणि दूध उत्पदानावर अवलंबून असते. खुराक पशुआहार तज्ञाच्या सल्ल्याने तयार करून घ्यावा. जनावराच्या आवश्यकतेनुसार आहारामध्ये ऑडीटीव्ह टाकले जातात. वरील खाद्य घटकांचा वापर करुन पशुपालक घरीच खुराक तयार करू शकतात.
हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार खुराक तयार करताना घ्यावयाची काळजी
जनावरासाठी मुख्यत: दोन प्रकारचा चारा उपलब्ध आहे. शेंगाधारी म्हणजेच द्विदल (बरसीम, लुसर्न, चवळी ई.) यामध्ये प्रथिनाचे प्रमाण 20 % असते. एकदल चारापिके (मक्का, ज्वारी, बाजरा, नेपिअर आणि अन्य गवत) यामध्ये प्रथिनाचे प्रमाण 8 ते 12 % असते. दुधाळ जनावराकरिता चांगल्या दूध उत्पादनासाठी आहारामध्ये 12 ते 14 % प्रथिनांची गरज असते. प्रथिने सर्वात महाग पोषक तत्त्व असल्यामुळे पशुंच्या आवश्यकतेनुसार आणि द्विदल चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार खुराकामध्ये प्रथिनयुक्त घटकांचे प्रमाण कमी केले जाऊ शकते आणि पशु आहार चांगला आणि स्वस्त बनविला जाऊ शकतो. जर पशुपालक मुरघास तयार करीत असेल तर मुरघासामध्ये उपलब्ध पोषकतत्वानुसार खुराक तयार केला पाहिजे.
फायद्याच्या टिप्स : भर उन्हाळ्यातील शेळीपालनाच्या 12 टिप्स
हिरवा चारा देताना दूध उत्पादन लक्षात घ्यावे, अधिक दूध उत्पादन असेल तर हिरवा चारा जास्त द्यावा. सुखा चाऱ्यामध्ये गव्हांडा, तणस, चना कुटार, सोयाबीन कुटार, ज्वारीचा कडबा इत्यादीचा वापर करता येईल. यामध्ये चना कुटाराचे पोषणमुल्ये जास्त आहेत तसेच ज्वारीच्या कडब्यामध्ये सुद्धा पोषणमुल्ये प्रमाणात असतात. कमी जागेत कडब्याचे उत्पादन जास्त प्रमाणात मिळते, याउलट गव्हांडा व तणस निकृष्ठ दर्जाचे कुटार आहे, परंतु हे जनावरांचे पोट भरण्यासाठी वापरले जाते. अश्यावेळेस खुराकाची गुणवत्ता व मात्रा योग्य प्रमाणात ठेवावी.
साधारणता एका जनावराला 5 किलो कुटार, 10 किलो हिरवा चारा, व 1.5 ते 2 किलो खुराक याप्रमाणे आहाराची गरज असते व दूध उत्पादनानुसार यामध्ये खुराकमध्ये वाढ करावी. तसेच हिरवा चारा सुद्धा वाढवावा.
दुधाळ जनावरामध्ये खनिज मिश्रनाचे महत्व
जनावराच्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी एकूण 22 खनिज तत्वाची आवश्यकता असते. यामधे 7 खनिज तत्त्व अधिक प्रमाणामध्ये तर 15 खनिज तत्वे सूक्ष्म प्रमाणामध्ये आवश्यक असतात. याव्यतिरिक्त हे खनिज तत्त्व दूध उत्पादन कायम ठेवण्यासाठी, पचनक्रिया योग्य ठेवण्यासाठी, शरीरामध्ये योग्य चयापचय ठेवण्यासाठी तसेच जनावराला उर्जा मिळवून देण्यासाठी महत्वपूर्व योगदान देतात. यामुळेच खुराकामध्ये 2 % खानिजे मिश्रण आणि 1 % मीठ आवश्यक आहे. जर खनिज मिश्रण वेगेळे द्यावयाचे असेल तर 50 % ग्राम दिले पाहिजे. अधिक प्रमाणात दूध देणाऱ्या जनावरामध्ये दुधाच्या प्रमानानुसार खनिज मिश्रण वाढवून दिले पाहिजे.
खनिजांच्या कमतरतेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे चयापचयाचे रोग होतात. संक्रमित रोगांची लागण होण्याची शक्यता वाढते. गर्भपात, वंध्व्यत, अनीमिया आणि दूध उत्पदानामध्ये घट या सर्व समस्या खानिजाच्या कमतरतेशी संबंधित आहे.
संक्रमण काळामध्ये दुधाळ जनावराचे पोषण व्यवस्थापन
संक्रमण काळ हा प्रसुतीच्या 3 आठवडे पहिले आणि 3 आठवड्यानंतरचा काळ असतो. हा काळ दुधाळ जनावराचा जीवनकाळामधला सर्वात कठीण आणि महत्वपूर्ण काळ आहे. या काळामध्ये जनावर गाभण असताना दूध देण्याच्या अवस्थेत प्रवेश करतात. ज्यामुळे पशुमध्ये संक्रमित रोगांची तसेच चयापचय समस्येला आहारी जाण्याची दाट शक्यता असते.
प्रसुतीच्या 2 महिन्यापूर्वी जनावर आपल्या शरीर वजनाच्या 2 % प्रमाणे शुष्क आहार खातो. या काळामध्ये गर्भाचे आकारमान वाढत असते. पोटावर त्याचा दबाव तयार झाल्याने जनावराचे खाद्य खाण्याचे प्रमाण नैसर्गिक रित्या कमी होते. अश्यावेळी जनावरांना पोषण मुल्यांची अधिक आवश्यकता असते. म्हणून या कालावधीत साधारणता 2 किलो अतिरिक्त खुराक दिला पाहिजे. या खुराकामध्ये पोषणमुल्यांची घनता वाढविली पाहिजे. तरच कमी खाद्यात जास्ती प्रथिने व उर्जा पुरविणे शक्य होईल. यामुळे प्रसुतीचा ताण कमी होऊन पुढील दूध उत्पादन सुलभ होते. विशेषत: जनावरांना चयापचयाच्या आजारापासून सुरक्षित ठेवता येते. अशाप्रकारे आहाराचे नियोजन करून दूध उत्पादन किफायतशीर करता येते.
डॉ आकाश राठोड, पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, यवतमाळ
डॉ अतुल ढोक, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर
महत्त्वाच्या टिप्स : उन्हाळ्यात शेळ्यांची अशी घ्या काळजी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1