यंदा अतिरीक्त उसाच्या प्रश्नाने शेतकऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वंची डोकेदुखी झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. ऊस लागवडीची नोंदणी सहकारी साखर कारखान्याकडे झाली नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही फडातच उभे आहेत. यामुळे उसाची तोडणीच होऊ शकली नाही. मात्र आता यावर उपाय म्हणून साखर आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे.
महत्त्वाची बातमी : अण्णा हजारेंच्या नव्या संघटनेची लवकरच घोषणा
साखर कारखान्याकडे बिगर नोंदणी असलेल्या उसाची नोंदणी शेतकऱ्यांना आता थेट साखर आयुक्तालयाकडे करता येणार आहे. यासाठी साखर आयुक्तालयाने स्वतंत्र ऊस नोंदणी ॲप विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या ॲपचे काम पूर्ण झाले आहे. त्याची आता चाचणी केली जात आहे. ही चाचणी येत्या आठवडाभरात पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.

महत्त्वाची बातमी : थांबा, पेरणीची घाई करु नका : कृषीमंत्री दादा भुसे यांचा सल्ला
ॲपच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी हे घरबसल्या त्यांच्या उसाची नोंदणी करू शकणार आहेत. यामुळे हे फायदेशीर ठरणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, यामुळे राज्यातील उसाचे अचूक क्षेत्र कळण्यास मदत होईल. तसेच साखर कारखान्याकडे उसाची नोंदणी नसली तर साखर आयुक्तालयाकडे मात्र नोंदणी होणार आहे. राज्यातील अनेक शेतकरी ऊस लागवडीची नोंदणी करत नाहीत. यामुळे अडचण निर्माण होते.
आनंदाची बातमी : आता रेशन दुकानातही मिळणार भाजीपाला आणि फळे

या अँपमुळे लागवड झालेल्या सर्वच उसाची नोंदणी होण्यास मदत होणार आहे. परिणामी साखर कारखान्याकडे नोंदणी नसलेल्या बिगर नोंदणी उसाची नोंदणी या ॲपवर होणार आहे. यामुळे उसाच्या गळपाचे देखील योग्य नियोजन करता येणार आहे. यामुळे अतिरिक्त ऊस आणि इतर अनेक प्रश्न निर्माण होणार नासल्याचे त्यांनी सांगितले.
लक्षवेधी बातमी : शेतकरी अपघात विमा योजना नव्या रूपात येणार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1