सणसर (ता. इंदापूर) येथे बुधवारी (ता. २) माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी दिली.
ब्रेकिंग : बुधवारी मी राजीनामा देईन ! ; कृषीमंत्र्यांचे खळबळजणक विधान
सध्या राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरू झाला असून कारखाने सुरू झाले आहेत. यामुळे उसाला किती दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखान्यांना इशारा देण्यासाठी उद्या सणसर येथे सायंकाळी भव्य ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेत उसाला एफआरपी मिळाली पाहिजे, ही प्रमुख मागणी असणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर उसाला एकरकमी एफआरपीची मागणी करण्यात येत असल्याचे सांगून अमरसिंह कदम म्हणाले, मागील हंगामातील एफआरपी व 200 रुपये प्रतिटन पैसे द्यावेत, चालू हंगामातील एफआरपीची एकरकमी रक्कम व 350 रुपये प्रतिटन रक्कम मिळाली पाहिजेत. साखर कारखान्याचे काटे ऑनलाइन करावे. हार्वेस्टर मशिनद्वारे तोडलेल्या मशिनची कपात 4.5 टक्क्यांऐवजी 1.5 टक्के करावी. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव उसाला मिळावा. सरसकट कर्जमाफी करावी. शेतीपंपास दिवसा सलग 12 तास वीज मिळावी. ऊस वाहतूकदारांची तोडणी कामगाराकडून फसवणूक टाळण्यासाठी कै. गोपीनाथ मुंडे महामंडळातर्फे कामगार उपलब्ध करून देण्यासह इतर मागण्या आहे. यामुळे आता शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

फायद्याची बातमी : सोयाबीन बाजार भाव सुधारण्याचे संकेत !
या ऊस परिषदेला साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. ऊस दरासाठी राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत राज्य सरकारला इशारा दिला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग न्यूज : जनशक्ती शेतकरी संघटनेचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1