पंढपुरात ऊस दर संघर्ष समितीने ऊसदराच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणीही वाहतूक करू नये असे आवाहन केले होते. आवाहन करूनही ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अडवून गुलाब देऊन ऊस वाहतूक थांबवण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र, काल रात्री या आंदोलनाला हिंसक वळण लागले. वाखरी इथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले.
मोठी बातमी : गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागू : कृषीमंत्री सत्तार
सध्या राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरु आहे. यामुळे उसाच्या बाजारभावावरून सध्या आंदोलन केले जात आहे. अनेक ठिकाणी हे आंदोलन चिघळत आहे. आता पंढरपुरात ऊस दराच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

मोठी बातमी : किसान सभेचा ‘ओला दुष्काळ’ प्रश्नी आता निर्णायक संघर्ष
पंढपुरात ऊस दर संघर्ष समितीच्या मेळाव्यात ऊसाला 3 हजार 100 रुपयांचा भाव मिळावा. तसेच पहिली उचल 2 हजार 500 रुपयांची मिळावी या अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबत निर्णय होत नसल्याने आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. ऊसदराच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणीही वाहतूक करू नये असे सांगण्यात आले होते, त्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अडवून गुलाब देऊन ऊस वाहतूक थांबवण्याची विनंती करण्यात येत होती. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना अज्ञात लोकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जनहित संघटना, जनशक्तीसह विविध शेतकरी संघटना एकत्र आल्या असून, ऊसदर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात ऊस दरावरून चांगलाच वाद पेटणार आहे.
महत्त्वाची बातमी : गुलाबी बोंडअळीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ फायद्याचा ठरणार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1