गतवर्षी समाधानकारक झालेले पर्जन्यमान, उत्तम ऊस बेणे निवड, पाणी आणि खत मात्राचे व्यवस्थापन आदींमुळे माळेगाव, सोमेश्वर, छत्रपतीसह सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सरासरी उसाचे एकरी उत्पादन यंदा वाढले. राज्यात एकरी शंभर टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन काढण्यासाठी अनेक शेतकरी पुढे येत आहेत. ते शेतकरी शिवारात प्रचंड कष्ट करतात. त्यामुळे हे पीक आळशी लोकांचे नव्हे, तर कष्टकऱ्यांचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
हे वाचा : अलर्ट : पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट
माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत कृषी विभागाने सुरू केलेल्या एकरी शंभर टन ऊस उत्पादन अभियानाचा प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, कृषी विभागाचे उसाचे क्षेत्र नव्हे, तर एकरी उत्पादन शंभर टनापर्यंत वाढविण्याचे अभियान निश्चित फायद्याचे ठरेल. पवारसाहेब आणि केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांचा ऊस पिकाचा मोठा अभ्यास आहे. अलीकडच्या काळात साखरेबरोबर इथेनॉल निर्मितीला संबंधित नेत्यांनी प्रोत्साहन दिले आहे.
लक्षवेधी बातमी : मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली या तीन शेतकऱ्यांनी कृषी पुरस्काराची रक्कम
मुख्यमंत्र्यांनीही ऊस पिकाबरोबर आता शेतकऱ्यांनी इतर पिकांनाही प्राधान्य देण्यासाठी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. हे जरी खरे असले, तरी शेतकरी शाश्वत पैसे मिळवून देणारे पीक म्हणून उसाला प्राधान्य देतात. त्यानुसार कृषी विभागाने एकरी उत्पादन शंभर टनांपर्यंत वाढविण्यासाठी जनजागृती अभियान सुरू केले आहे.
महत्त्वाची बातमी : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ; काय होणार परिणाम ?
दरम्यान, पवार यांनी बारामती परिसरातील चाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी शासनस्तरावर दीड कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. या वेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, ‘छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी (पुणे) ज्ञानेश्वर बोटे आदी उपस्थित होते. बारामती तालुक्यातील भौगोलिक स्थितीचा विचार करून माळेगावचे उसाचे कार्यक्षेत्र वाढविले जाईल. तशापद्धतीच्या सूचना साखर आयुक्तांना दिल्या जातील. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ‘माळेगाव’च्या प्रशासनाने सभासद करून घ्यावे, असा धोरणात्मक निर्णय पवार यांनी जाहीर केला.
महत्त्वाची बातमी : आता उसापासून तयार होणार जाम !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1