Sugarcane Season : यंदा 1 नोव्हेंबर पासून ऊसाचे गाळप सुरु होण्याची शक्यता

0
342

Sugarcane crushing Season : यंदा अपेक्षीत पाऊस न पडल्याने येत्या ऑक्टोबर महिन्यात साखर कारखाने (Sugar factories) सुरु होण्याची शक्यता कमी असून, 1 नोव्हेंबर 2023 पासून यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोठी बातमी : आता माती परीक्षणासाठी कृषी विभाग घेणार पोस्ट ऑफिसची मदत

दरम्यान, दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री समितीची बैठक (Meeting of the Committee of Ministers) होणार असून, त्यामध्ये ऊसाचा गळीत हंगाम कधी सुरु करायचा ? याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत ऊसाची थकीत बिले, राज्यातील ऊसाची एकूण उपलब्धता याचा आढावा घेण्यात येणार असून, याचवेळी गाळप हंगामाची तारीख निश्चित केली जाणार आहे.

या वर्षी अपेक्षीत पाऊस न पडल्याने यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम कधी सुरु होणार याची चर्चा सध्या सुरु आहे. राज्यात साखर हंगाम (Sugar Season) सुरु करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह (Pollutant) आहेत. ऊसाचे घटलेले उत्पादन आणि चाऱ्यासाठी होत असलेला वापर बघता गाळप हंगाम 15 ऑक्टोबरला सुरु करण्याची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे लवकर हंगाम सुरु केल्यास उसाला योग्य उतारा मिळणार नाही आणि त्यातून शेतकरी आणि कारखान्यांना आर्थिक फटका (Economic Impact) बसण्याची शक्यता असल्याने हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरु करावा, अशीही मागणी होत आहे.

फायद्याची माहिती : बांबू लागवड योजनेसाठी या 4 जिल्ह्याची निवड

यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी (Low Rainfall) आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम (Effects) ऊसाच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात घट (Decline Sugar Production) होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशातील साखर उत्पादनापैकी सुमारे एक तृतीयांश साखर उत्पादन महाराष्ट्रात होते. मात्र यंदा पावसाअभावी ऊसाचे घटलेले क्षेत्र, विविध साखर कारखान्यांनी वाढवलेली क्षमता (Capacity) यामुळे यावर्षी ऊस गाळप हंगाम (Cane Screening Season) कसाबसा केवळ तीन महिने चालण्याची शक्यता आहे.

साखर आयुक्तालयाच्या अंदाजानुसार यंदा 970 लाख टन ऊसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. यातील 15 लाख टन साखर इथेनॉल (Ethanol) तयार करण्याकडे वळवली जाणार आहे. त्यामुळे यंदा राज्यात 94 लाख टन साखरेचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने ऊसाचा गळीत हंगाम चालणार आहे.

यंदा कमी पावसामुळे ऊस उत्पादनात 15 ते 18 टक्के घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुऱ्हाळघरे (Yield Gharghar) आणि खांडसरी (Khandsari) सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघरे आणि खांडसरीला पाठवत आहेत. जर राज्यातील गाळप हंगाम उशिरा सुरु झाला तर काही शेतकरी तोपर्यंत गाळपासाठी अन्य पर्याय (Other Alternatives) स्वीकारू शकतात. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

गुडन्यूज : यंदा डाळिंबाचे पैसेच होणार !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here