राज्यामध्ये आजपर्यंतच्या सर्व शासनाने ऊसतोड कामगारांची फसवणूकच केली आहे. ऊसतोड मजुरांच्या मागण्यांसाठी संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवा, असे आवाहन ऊसतोड व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केले.
ब्रेकिंग : यंदा कापूस भाव खाणार
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे बुधवारी झालेल्या राज्यस्तरीय ऊसतोड कामगार परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दत्ता डाके, एम. एच. शेख, सुभाष जाधव, आबासाहेब चौगुले, नामदेव राठोड, मोहन जाधव, अॅड. अजय बुरांडे, मारोती खंदारे, पांडुरंग राठोडी, मुसद्दीक बाबा, अशोक राठोड, मनीषा करपे, बी. जी. खाडे आही मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मोहन जाधव यांनी ऊसतोड कामगारांचा फक्त वोट बॅंक म्हणून वापर करतात असा आरोप केला.
मोठी बातमी : पीएम किसान योजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम
या परिषदेत ऊसतोड मजुरांच्या विविध मागण्यांसाठी काही ठराव घेण्यात आले. यामध्ये 20 सप्टेंबरला पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. दरम्यान यावेळी गोपिनाथराव मुंडे ऊसतोड कल्याणकारी महामंडळाची प्रभावी अंमलबजावणी करावी, कामगारांची नोंदणी करा करून कामगारांना प्रत्यक्ष लाभ देण्यात यावा, महागाईच्या प्रमाणात मुकादमाचे कमिशन व पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या प्रमाणात दर वाढवावे व ऊसतोडणी कामगारांसाठी घरकुल योजना सुरू करावी या मागण्याचे ठराव घेण्यात आले.
राज्यस्तरीय ऊसतोड कामगार परिषद यशस्वी करण्यासाठी अॅड. सय्यद याकूब, सुदाम शिंदे, डॉ. अशोक थारोत, काशिराम सिरसट, सुहास झोडगे, गंगाधर पोटभरे, मुरलीधर नागरगोजे, बाळासाहेब चोले, अंगद खरात, संतोष जाधव, ओम पुरी, लहू खारगे, फारुक सय्यद, विजय राठोड, मीरा शिंदे, शिवाजी जाधव, मधुकर आडागळे, विनायक चव्हाण, शिवाजी कुरे, कृष्णा सोळंके, गणेश राठोड, सुहास जायभाये, सुभाष डाके, गजानन जाधव, प्रशांत मस्के, जगदीश फरताडे, शांतिलाल पट्टेकर यांनी पुढाकार घेतला. परिषदेला ऊसतोड कामगार मोठ्या संखेने उपस्थित होते.
ब्रेकिंग : या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पहिल्या टप्प्यात मदत
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1