निसर्गाची पर्वा न करता रात्रंदिवस ऊसतोड मजूर हा ऊसतोडणीसाठी काबाडकष्ट करतो. अंधारात पहाटे उठून ऊस तोडून साखर कारखान्यांना पोहोच करण्याचे काम करतो. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांना पूरेपूर न्याय मिळवून देऊ, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
आनंदाची बातमी : आता लवकरच सांगलीला हळद चढणार
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित शेतकरी मेळावा आणि गळीत हंगाम सांगता समारंभ कार्यक्रमात मुंडे बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दत्ता शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार दीपक साळुंखे, लोकनेते शुगरचे अध्यक्ष बाळराजे पाटील, संतोष पवार, कारखान्याचे कार्यकारी संचालक विशाल शिंदे, तुळजाभवानी शुगरचे सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

मोठी बातमी : कांद्याचा दरात मोठी घसरण : कांदा फक्त 1 रुपये किलो
यावेळी पुढे बोलताना मुंडे म्हणाले, की ऊसतोड मजुरांच्या खूप व्यथा आहेत. या व्यथा सोडविण्यासाठी कामगार विभागाकडे जाणारे हे महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे घेतले आहे. महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत मजुरांचा विमा उतरविला जाणार आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. ऊसतोड मजुरांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. प्रती टन दहा रुपये कारखान्यांनी महामंडळाकडे जमा केल्यास शासन दहा रुपये देणार आहे. महामंडळामार्फत साखर कारखान्यांच्या सहकार्याने शंभर टक्के ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांना ओळखपत्र, बांधकाम कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी योजना व सामाजिक सुरक्षा लागू करण्यात येणार असल्याचेही श्री. मुंडे यांनी सांगितले.
हे वाचा : लिंबू 10 रुपयाला दोन, घेतंय का कोण ? का लावू शरद पवारांना फोन ! शेतकऱ्याचा व्हीडिओ व्हायरल
यावेळी बोलताना अध्यक्ष शिंदे म्हणाले, ‘‘विक्रमी गाळपासोबत वीज निर्मिती कारखान्याने केली आहे. शेतकऱ्यांचा विकास हेच ध्येय ठेवून काम करीत आहे. कारखाना बंद झाल्यानंतर पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिलाचे १४० कोटी रुपये जमा केले. उर्वरित तीन कोटी ६० लाख रुपयेही लवकरच जमा करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नक्की वाचा : पुणतांब्यातून पुन्हा शेतकऱ्यांची आंदोलनाची हाक : सरकारला ७ दिवसाचे अल्टीमेटम

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1