अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाचेची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता, त्याचा याचा व्हिडिओही व्हायरल झाला. विशेष म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून, या प्रकरणी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन या प्रकरणातील दोषी असलेल्या कृषी सहायक रोहिणी मोर यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.
हे वाचा : सणसर येथे उद्या ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्रकारांनी या प्रकाराबद्दल प्रश्न विचारले होते. त्यावर बुधवारपर्यंत घडल्या प्रकाराची चौकशी करू आणि दोषीवर कारवाई करू अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली होती. मात्र अवघ्या अडीच तासात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन संबंधीत कृषी सहायक रोहणी मोरे यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांनी बोलताना दिली आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाच्या पथकाद्वारे केले जात आहेत. अतिवृष्टीमुळे पीकाच्या नुकसानीमुळे आधीच अडचणीत झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामा करण्यासाठीदेखील लाच द्यावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव या निमित्ताने समोर आले आहे.
ब्रेकिंग : बुधवारी मी राजीनामा देईन ! ; कृषीमंत्र्यांचे खळबळजणक विधान
हा व्हिडिओ अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील असल्याचे म्हटले जात आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारकडून पंचनामे सुरू आहेत. नेवासे तालुक्यात पंचनामे करण्यासाठी दर एकर मागे 400 रुपयांची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महसुल विभागाने नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी करण्यात येत आहे. एका शेतकऱ्याने हा सगळा प्रकार व्हिडिओत आहे. पंचनाम्यासाठी पैसे मागण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी तलाठी आणि ग्रामसेवकाकडे कारवाईची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये काहीजण शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय, ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिलेत, त्यांच्या नावाची यादी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणात अजून कोण कोण सहभागी आहेत, त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशीही माहिती कृषीमंत्र्यांनी दिली असून, शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांची हयगय करण्यात येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
फायद्याची बातमी : सोयाबीन बाजार भाव सुधारण्याचे संकेत !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1