शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरु असून, काल नाशिक जिल्ह्यातील वणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी-सुरत महामार्गावर आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाताखाली हे आंदोलन सुरू आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कांदे, द्राक्ष रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला.
मोठी बातमी : कांदा उत्पादकाच्या आडचणीत वाढ : दराची घसरण सुरूच
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीन चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या विविध भागात आंदोलन सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील शिर्डी-सुरत महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा आणि द्राक्षे रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. तर काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या नोटिसांच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. स्वाभिमानीच्या कार्यकर्ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. सरकारने शेतीमालाच्या दरासंदर्भात चुकीची धोरण अवलंबली आहेत. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर येत असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.
संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. वणीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्ता रोको केल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
चिंताजनक : लातूर विभगात हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव
सध्या सोयाबीन आणि कापसाचे दर घसरले आहेत. कांद्याचे दर घसरले आहे. अनेक शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्हा बँकेनं 62 हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव सुरू केले आहे. यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे संदीप जगताप म्हणाले.
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित वीज दर, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस, थकीत उसाची एफआरपी, पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई, तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तसेच बुलढाण्यात शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी केली आहे.
खूशखबर : पीएम किसानचा 13 वा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1