सध्या हिवाळा चालू असून थंडीचे प्रमाण वातावरणात जास्त आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. थंडी अशीच कायम राहिल्यास याचा परिणाम फळ पिकांवर होण्याची शक्यता आहे. कमी तापमानामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. त्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
लक्षात ठेवण्याजोगे : केळी उत्पादनाचे नवे तंत्र
रब्बी हंगामातील पिके ही थंडीला अनुकूल असतात. तरीही तापमान कमी झाले तर काही पिकांवर याचा विपरित परिणाम होतो. कमी तापमानामुळे पपई तसेच केळी या पिकाची वाढ थांबणे, क्रॅकिंग होण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे या काळात आपल्या फळ पिकांच्या बागांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
हिवाळ्यात दहा अंश सेल्सिअसच्या कमी तापमानाची नोंद होताच केळीची नैसर्गिक वाढ थांबते. पाणी पिवळी पडायला लागतात आणि गंभीर परिस्थितीत ऊती मरायला लागतात. केळीच्या बागा सर्वसामान्य दिसत असल्या तरी अधिकच्या गारव्यामुळे केळीच्या घडांची वाढ खुंटलेली असते. केळीच्या घडाचा आकार वाढलेला दिसतो पण आत मधून तो भाग पोखरला जाऊ शकतो. यालाच घसा खडू असे म्हणतात. त्यामुळे कधीकधी घड परिपक्व होण्यास पाच ते सहा महिने लागतात. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात घडाची वाढ होत नाही.
शक्यतो थंडीच्या काळात फुल लागवड होउच नये. कारण हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे किंवा कधीकधी गुच्छ आभासी खोडातून योग्यप्रकारे बाहेर येत नाहीत म्हणून गुच्छ ची वाढ चांगली होत नाही. टिशू कल्चर पासून तयार केलेल्या केळीतील फुल नवव्या महिन्यात लागतात. तर साकरणे लावलेल्या केळीतीलफुल दहाव्या किंवाअकराव्या महिन्यात येते.
महत्त्वाची माहिती : पपई बागेतील रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना
केळीच्या बागेसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असते. वर्षभर केळीच्या बागेला पाणी दरमहा दहा सेंटिमीटर कमीतकमी स्वरूपात वितरित करावे लागते. केळीच्या शेताची माती हिवाळ्यात नेहमीच ओलसर असणे आवश्यक आहे. त्यामुळे हिवाळा सुरू होण्यापूर्वी केळीच्या बागेत हलक्या प्रकारची मशागत करणे गरजेचे असते. त्यासाठी लहान ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट करून घ्यावी तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होतास खतांची मात्रा देणे गरजेचे आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी होणार आहे. इतर हंगामात नाही पण थंडीमध्ये केळीच्या बागा याची विशेष काळजी हाच महत्वाचा एक पर्याय आहे.
सर्व साधारण थंडी पासून रक्षणासाठी केळीच्या घडांना प्लास्टिक पेपरने आच्छादन करावे. तसेच बागांना रात्रीचे पाणी दिल्यास बागांमधील तापमान नियंत्रित राहते. अतिथंडी असेल तर बागांमध्ये शकोटी करावी त्याचा फायदा बागांना होतो. याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
प्रा. डॉ. पद्माकर कुंदे, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
महत्त्वाच्या टिप्स : थंडीत फळबागांची अशी घ्या काळजी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1