महाराष्ट्रात सर्वसाधारणत: शेळ्या या चराई पद्धतीवर पाळल्या जातात. त्यात त्यांना रोज चरण्यासाठी किमान 8 ते 9 किलोमीटर चालावे लागते. उन्हाळ्यात बहुतांश वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ठ प्रतीचा चारा शिल्लक असतो. अश्यावेळी शेळ्याची बरीच शक्ती चालण्यात जाते आणि त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही तसेच उन्हात चरण्यामुळे त्यांना भीषण उष्ण तापमानाचा सामना कारावा लागतो आणि त्यांना उष्णतादाह होण्याची शक्यता असते. तसेच शेळ्यांच्या वाढ, उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते. काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यताही वाढते आणि व्यवसायात तोटा संभवतो. म्हणून या व्यवसायातील वृद्धीसाठी उन्हाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
ब्रेकिंग : आता टेस्ट ट्यूब शेळी !
शेळ्यांमधील उष्णतादाहाची लक्षणे : शेळ्या सावलीत राहणे पसंत करतात, खाद्य खाणे कमी करते, पाणी पिण्याचे प्रमाणात वाढते, अस्वस्थता वाढते श्वासोच्छवास वाढतो, शेळ्या तोंड उघडून श्वास घेतात हृदयाचे ठोके वाढतात, घामाचे प्रमाण वाढते, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, लघवी करण्याचे प्रमाण कमी होते, शेळ्याच्या मासाची गुणवत्ता खराब होते.
उन्हाळ्यात शेळ्यांसाठी निवारा : उन्हाळ्यात उष्णतेपासून शेळ्यांचा बचाव होण्याकरिता त्यांच्या करिता निवारा असणे गरजेचे आहे. बांबू, लाकडे, वाळलेले गवत, तुराटया इ. च्या सहाय्याने शेळ्यांसाठी कमी खर्चात निवारा तयार करता येऊ शकतो. असा तात्पुरता निवारा जमिनीपासून 7 ते 8 फुट उंच असावा. उन्हाळ्यामध्ये शेळ्याच्या लेंड्यापासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्यक आहे. निवाऱ्यात शेळ्यांना थंडावा वाटावायाकरिता निवाऱ्याच्या उघड्या बाजूस सुतीकापड किंवा ग्रीनगार्डन नेट किंवा सुतीपोती लावून घ्यावी व त्यावर पाणी शिंपडून घ्यावे. पक्के गोठे असतील तर गोठ्यात फोगर (बाष्पक) आणि हवा खेळती राहावी याकरिता पंखे बसवून घ्यावेत. गोठ्यामध्ये शेळ्यांना पुरेशी जाग उपलब्ध करून दिल्यास गोठ्यातील तापमान वाढत नाही याकरिता प्रत्येक शेळीला सुमारे 15 चौरस फुट जागा हवी असते. एका गोठ्यात 50-60 पेक्षा अधिक शेळ्यांना ठेवू नये. गोठ्याचे छत पक्के असेल(सिमेंट कॉंक्रीट किंवा पत्रे) तर गोठ्याच्या छतास चुना किंवा पांढऱ्या पेंटचा जाड थर मारून घ्यावा ज्यामुळे आतील तापमान 2 ते 3 अंश सेल्सीअस ने कमी होण्यास मदत होते.
महत्त्वाची माहिती : उस्मानाबादी शेळीची अशी घ्या काळजी
उन्हाळ्यातील चराई व्यवस्थापन : शेळ्यांना चरण्याकरिता सकाळी लवकर (5 ते 9 दरम्यान) आणि सायंकाळी उशिरा (5 ते 8 दरम्यान) चराईसाठी सोडावे. शक्य नसल्यास चराई क्षेत्रावर त्यांना दुपारी 12 ते 4 या वेळेत दाट सावलीच्या झाडाखाली ठेवावे.
उन्हाळ्यात शेळ्यांचे पाणी व्यवस्थापन : सर्वसाधारणत: शेळ्यांना पिण्याकरिता दररोज 5 ते 7 लिटर पाणी लागते. परंतु उन्हाळ्यात त्यांना 15 ते 20 लिटर पाणी लागते. किंवा प्रति एक किलो शुष्क चाऱ्यामागे 4 लिटर पाणी देणे आवश्यक आहे. बंदिस्त शेळीपालनात पिण्याचे मुबलक स्वच्छ ताजे पाणी 24 तास उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याचे तापमान 20 ते 24 अंश सेल्सीअस असावे. उन्हाळ्यात शेळ्यांना पिण्यासाठी माठ किंवा रांजणातील पाणी दिल्यास ते पाणी शेळ्या आवडीने पितात.
महत्त्वाचे : आता शेंळ्यांमध्येही कृत्रिम रेतन !
उन्हाळ्यातील शेळ्यांचे खाद्य व्यवस्थापन : शेळ्यांकरिता दिल्या जाणाऱ्या दैनंदिन आहारात सकस हिरव्या चाऱ्याचा आविर्भाव असावा. प्रत्येक मोठ्या शेळीस 3 ते 5 किलोग्राम हिरवा चारा मिळेल असे नियोजन उन्हाळ्याआधीच करून ठेवावे. त्यासोबतच 200 ते 300 चांगल्या प्रतीचे पशुखाद्यही पुरविण्यात यावे. हिरवा चारा कमी उपलब्ध असल्यास हिरवा-सुका चारा आणि पशुखाद्य सोबत मिसळून ओले मिश्रण तयार करून संमिश्र खाद्य दिल्यास त्यांचे खाद्य सेवन वाढते. चारा आणि पशुखाद्याचे प्रमाण हे 50:50 असावे. उपलब्ध असलेला हिरवा चारा शेळ्यांना द्यावा. मांस वाढीसाठी आवश्यक घटक चाऱ्यातून मिळत नाहीत. त्यामुळे चाऱ्यामध्ये इतर घटक जसे क्षार मिश्रण, जीवसत्वे, प्रोबायोटिक्स यांचा वापर करावा. बंदिस्त शेळीपालनातील शेळ्यांना दिला जाणारा दैनंदिन आहार हा 3 ते 4 भागात विभागून सकाळी आणि सायंकाळच्या वेळी देण्यात यावा.
उन्हाळ्यातील शेळ्यांचे पूरक खाद्य व्यवस्थापन : प्रोबायोटीक्सच्या वापरामुळे ओटी पोटाला आवश्यक असणारे सूक्ष्मजीव मिळून पचनक्रिया जलद होते. यामुळे मांस उत्पादन वाढते तसेच शेळीची प्रकृती चांगली राहते. प्रोबायोटीक्स हे लहान शेळ्याच्या पिलांना 2.5 ग्राम प्रत्येक दिवशी आणि 5 ग्राम प्रजनन किंवा उत्पादनासाठी असलेल्या शेळ्यांमध्ये द्यावे.
फायद्याची माहिती : असा आसावा शेळ्यांचा आहार
शेळ्यांच्या आहारातील स्निग्धाचे प्रमाणहे 3 ते 5 टक्के एवढे ठेवता येते. स्निग्धाचे प्रमाण हे 5 टक्कके पेक्षा अधिक नसावे. शेळ्यांच्या आहारात मेथीच्या बिया 10 ग्राम प्रति दिवस आणि चांगल्या प्रतीचे प्रोबायोटिक्स 2 ग्राम प्रति दिवस याप्रमाणे समावेश केल्यास शेळ्यांची वाढ व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच दुध देणाऱ्या शेळ्यांचे दुध उत्पादन देखील वाढते. खाद्यासोबत पूरक म्हणून लहान शेळ्यांना पाण्यासोबत ईलेक्ट्रोलायीट पावडर पाण्यात मिसळून द्यावे. ज्याचे पाण्यात विरघळल्यास आयन तयार होतात आणि जीवनसत्त्वे हे पाण्यात दोन चमचे मिसळावे. ज्यामुळे उन्हाळ्यात लहान शेळ्यांच्या शरीरातील पाणी कमी होणार नाही. उष्णतेमुळे शेळ्यांच्या तोंडाला पुरळ येतात. त्यासाठी सब्जाच्या बिया तुळस ज्याला उत्तम तुळशी देखील म्हणतात त्या पाण्यामध्ये टाकून मिसळून घ्यावे आणि ते दुपारी अधिक उष्णतेच्या काळात शेळ्यांना पिण्यास द्यावे.
कलिंगडचे फळाचे उरलेले टाकाऊ अवशेष शेळ्यांना उन्हाळ्यात अधिक उष्णतेच्या वेळी शेळ्यांना खाण्याकरिता द्यावे. शेळ्यांना त्यांच्या प्रति किलो शरीर वजनास 1000 मिली ग्राम या प्रमाणे विटामिन ई आणि सेलेनियम 3 मिली ग्राम प्रति 50 किलो ग्राम शरीर वजनास याप्रमाणे तसेच सी जीवनसत्त्व 100 मिली ग्राम प्रतिकिलो ग्राम शरीर वजनाच्या प्रमाणात दिल्यास उष्णता दाहाचा त्रास कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यातील शेळ्यांचे लसीकरण : आंत्र विषार ही लस वर्षातून एकदा एप्रिलमध्ये दोन मात्रा पंधरा दिवसाच्या अंतराने द्याव्यात, लाळ्या खुरकुत लसीकरण मार्च किंवा एप्रिल महिन्यात तसेच घटसर्प लस वर्षातून एकदा मार्च किंवा एप्रिल महिन्यात देण्यात यावी. लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व नंतर एलेक्त्रोलायीट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे. यामुळे शेळ्यांवर लसीकरणाचा ताण येणार नाही. तसेच लसीकरण करण्याच्या आठ दिवस आधी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शेळ्यांना जंतनाशनाचा डोस देऊन घ्यावा.
फायद्याच्या टिप्स : शेळ्यांच्या उत्पादन वाढीसाठी… !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1