आपल्या देशातील जवळपास 60 टक्के लोक हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत. यामुळे देशाची जीडीपी देखील सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती व्यवसायाला अधार म्हणून आपल्या देशात अनेक शेतीपूरक व्यवसाय केले जातात. अशा शेतीपूरक व्यवसायाने ग्रामिण अर्थव्यस्थेचा कणा मजबूत करण्याचे काम केले आहे. त्यातून शेतकर्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक स्थिरता मिळालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यावसाय हा महत्त्वाचा व्यवसाय असून, त्याखालोखाल शेळीपालन आणि कोंबडी पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन म्हणजेच कोंबडी पालन. शेतीबरोबरच पशुपालन आणि कुक्कुटपालन देखील देशात महत्त्वाचे मानले जाते. कारण कमी जागेत आणि खर्चात हे काम जास्त उत्पन्न मिळवून देते.
नक्की वाचा :कोंबड्यांच्या फायदेशीर जाती
गेल्या काही वर्षात कुक्कुटपालन व्यवसायातून आर्थिक प्रगती साधणारे अनेक शेतकरी आहेत. मात्र गेल्या काही दिवसात कोंबडी खाद्याच्या दरात वाढ झाल्याने आणि हवामानातील बदलामुळे वाढलेल्या तापमानामुळे या व्यवसायात काही दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वत: खाद्य निर्मिती करून खाद्याचा प्रश्न सोडवता येतो. परंतु हवामानातील बदलाचा प्रश्न सोडवण्यासाठी व्यवसस्थापनात काही बदल करून लहानसहान उपायोजना करण्याचा सल्ला पशुवैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ देतात.
विशेषतः उन्हाळ्यात कोंबड्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. शिवाय या हंगामात त्यांच्या आहाराकडे देखील विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. कारण उन्हाळ्यात कोंबड्यांना संसर्गजनीत रोग होण्याचा धोका जास्त असतो. पोल्ट्री व्यवसाय केवळ अंड्यांच्या उत्पादनासाठीच केला जात नाही, तर त्याच्या चिकनलाही बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे उन्हाळ्यात योग्य काळजी व आहार न मिळाल्याने अनेक कोंबड्यांचा अकाली मृत्यू होतो. त्यामुळे पोल्ट्री उत्पादकांना मोठे आर्थिक भुर्दंड सहन करावे लागते.
फायद्याच्या टिप्स : पावसाळ्यात घ्या कोंबड्यांची निगा
उष्माघातची लक्षणे : कुक्कुटपालन व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात कोंबड्यांना अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यांची अंडी घालण्याची क्षमता कमी होऊ लागते. एवढेच नाही तर उन्हाळ्यात कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढते. दुसरीकडे, कमी आहारामुळे, अंड्यांचे उत्पादन कमी होऊ लागते आणि त्यांचा आकार देखील लहान होतो. अंड्यांवरील आवरण देखील कमकुवत आणि पातळ होते, ज्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायात नुकसान सहन करावे लागते.
तापमान जेव्हा 39 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त असते तेव्हा कोंबड्यांना खूप त्रास होतो. या तापमानात कोंबड्याना उष्माघात येण्याचा धोका अधिक वाढतो. उष्माघातात कोंबडीची चोच फुगते, अशक्त होतात, चेंगराचेंगरी सुरू होते आणि अर्धांगवायू होऊन त्यांचा मृत्यू होतो.
नक्की वाचा : कसे करावे लाव्ही पालन ?
प्रोटीनयुक्त आहाराची गरज : उन्हाळ्यात कोंबड्यांना प्रोटीनयुक्त आहार आवश्यक उन्हाळ्यात कोंबड्या कमी धान्य खातात. त्याची भूक कमी होते. त्यामुळे या ऋतूमध्ये कोंबड्यांना अन्न देताना विशेष काळजी घ्यावी लागते.
उन्हाळ्यात कोंबडीच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त असायला हवे जेणेकरून कमी खाल्ल्यानंतरही कोंबडीला आवश्यक ते सर्व घटक मिळू शकतील आणि कोंबड्या निरोगी राहतील. त्याच वेळी, अंड्याचे शेल पातळ होऊ नये म्हणून आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी ओस्टो कॅल्शियम लिक्विड पाण्यात देता येऊ शकते.
कोंबड्यांचा आहारा : तज्ज्ञांच्या मते, कोंबड्यांना थंडीच्या काळात धान्य खायला आवडते. त्यामुळे दुपारी कोंबडीना लाईटचा प्रकाश देण्याव्यतिरिक्त, सकाळी थंड वातावरणात जास्त प्रकाश द्या जेणेकरून कोंबड्या अन्नाचा पुरेपूर वापर करू शकतील.
साधारणपणे, कोंबड्या 60 अंश ते 80 अंश तापमानाला प्राधान्य देतात कारण या तापमानात कोंबडीचा आहार आणि अंडी उत्पादनाचा दर जास्त असतो. जास्त तापमानामुळे, कोंबडी कमी खातात आणि कमी अंडी घालतात, ज्यामुळे पोल्ट्री फार्मर्सचे नुकसान होते. त्यामुळे कोंबड्यांच्या आहाराच्या वेळेचीही काळजी घेतली पाहिजे.
नक्की वाचा : कसे करावे बदक पालन ?
पाण्याची व्यवस्था : उन्हाळ्यात कोंबड्यांना अधिक पाणी लागतं असते. कोंबडयांना उन्हाळ्यात दुपटीने पाणी लागते. यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये नेहमी स्वच्छ आणि थंड पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याचबरोबर प्लास्टिक किंवा झिंकपासून बनवलेले पाण्याचे भांडे ठेवू नका. त्याऐवजी, मातीचे भांडे वापरावे जेणेकरुन त्यात पाणी जास्त काळ थंड राहील. उन्हाळ्यात, कोंबडी फार्मच्या खालील पृष्ठभागाची जाडी 2 इंचांपेक्षा जास्त नसावी. जर लिटर जुने झाले असेल तर ते काढून टाका आणि नवीन लिटर वापरा. असे केल्याने कोंबड्यांमध्ये संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होईल.
उष्माघातातील काळजी : पोल्ट्री फार्मचे छत पांढऱ्या रंगाने रंगवावे, जेणेकरून सूर्याची किरणे छतावर पडून परत जातील. एस्बेस्टोस शीट्स छतावर देखील स्थापित केल्या जाऊ शकतात, यामुळे छताला जास्त गरम होण्यापासून रोखता येते. खिडक्यांपासून 3-5 फूट अंतरावर गोणपाटाचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडून कोंबड्यांचे फार्म थंड करता येते. फॉगर्सची सुविधा उपलब्ध असल्यास पोल्ट्री हाऊसचे तापमानही कमी होऊ शकते. याशिवाय पंखे आणि कुलरचा वापर करून पोल्ट्री हाउसचे तापमानही नियंत्रणात ठेवता येते. अशा पद्धतीने काळजी घेवून काही उपाययोजना केल्यास उन्हाळ्यात कोंबड्यांना होणारा त्रास कमी होऊन मरतुकेचे प्रमाण कमी करता येते. परिणामी कोंबडी पालन आर्थिकपातळीवर यशस्वी होते.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1