Guaranteed Price : शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत हमी भावापेक्षा कमी भावात पीक उत्पादन विकावे लागू नये, यासाठी प्रमुख पिकांचे हमी भाव (Guaranteed Price) जाहीर केले आहेत. त्याबद्दलची खरेदी प्रणाली तयार केली आहे. मात्र यानंतरही शेतकऱ्यांना काही व्यापारी एकत्रित येऊन फसविण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर थेट कारवाई (Direct Action) करण्यात यावी, असे आदेश पणनमंत्री अब्दुल सत्तार (Marketing Minister Abdul Sattar) यांनी आज जिल्हा प्रशासनाला (District Administration) दिले.
हेही वाचा : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
नागपूर येथे पणन (Panan Corporation) व वक्फ बोर्ड (Waqf Board) विभागाचा आढावा पणनमंत्री सत्तार यांनी आज घेतला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये हमीभावाने सुरु असलेल्या खरेदी प्रक्रियेची (Purchase Process), उपलब्ध अन्न धान्य साठ्यांचा (Food Grain Stock) तसेच खरेदी विक्री संघाच्या (Purchase Sales Team) कामकाजासंदर्भातील सद्यस्थितीबाबत (Current Status) विभाग प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पणन महासंचालक केदारी जाधव, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, मार्केटिंग फेडरेशनचे (Marketing Federation) महाव्यवस्थापक अतुल नेरकर, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांचाशिवाय पणन संदर्भातील विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून अफवा पसरविल्या जात असल्याच्या तक्रारी असल्याचे सांगून, पणनमंत्री सत्तार म्हणाले, आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर भाव नाही, शासनाकडून (Govt) लवकर पैसे मिळणार नाही, बारदाना नाही, ठेवायला जागा नाही, शासन खरेदी करु शकत नाही. अशा अनेक अफवा (Rumor) पसरवून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी सुरु असल्याच्या काही तक्रारी आहेत. मात्र ही बाब योग्य नसून या अपप्रचाराला मोडून काढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यासाठी वेळोवेळी हमी भाव, खरेदी करणारी यंत्रणा, (Procurement Mechanism) मिळणाऱ्या सुविधा (Facility) व सुरक्षितता (Security) या संबंधातील प्रचार-प्रसार (Promotion) करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
महत्त्वाची माहिती : रांगडा कांदा भरघोस उत्पादणासाठी असे करा नियोजन
https://www.facebook.com/shetimitramagazine03