सागवाण हे चांगले अर्थार्जन देणारे झाड आहे. साग लागवड उष्ण व दमट हवामानात यशस्वी होऊ शकते. याला 1250 मिमी ते 3000 मिमी पर्जन्यमान व कमाल 48 अंश सेल्सिअस किमान 4.5 सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते.
डोंगरी भागात, सपाट भागात निचरा होणार्या गाळाच्या जमिनीत तसेच कमी उतारावरील जमिनीत साग चांगला पोसू शकतो. मात्र एकदम उताराच्या जमिनीत याची वाढ चांगली होऊ शकत नाही. सागाला खोल, सुपीक व निचरा होणारी जमीन पोषक ठरते. पाणथळ जमिनीत साग तग धरू शकत नाही. तसेच खारवट जमिनीतही सागाची वाढ होऊ शकत नाही. सागाला वालुकामय, मुरमाड, चिकनमाती व पोयट्याच्या मातीची जमिनही चालते. साग लागवडीपूर्वी जमिनीचे परिक्षण करून कोणकोणते घटक आहेत. याची माहिती द्यावी. तसेच आम्ल विम्लताही तपासून पहावी सागाला विम्ल जमीन उपयुक्त असते. सागाला योग्य तापमान असेल तर त्याची वाढ चांगली होऊ शकते. सागाला लावगडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. जमिनीमध्ये अडवी उभी नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी त्यामध्ये सेंद्रिय खतांची मिसळण करावी, शेणखत व कंपोस्ट खताचा वापर करावा. डोंगर उतारावर खड्डे पद्धतीचा वापर करावा. सागशेतीसाठी प्रयत्न केल्यास कमीखर्चात जास्त उत्पन्न घेता येईल मात्र त्यासाठी वेळ द्यावा लागतो. झाडाची वाढ लवकर होण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन काही सुधारित वाणाचा वापर करावा म्हणजे लवकरात लवकर झाडाची वाढ होईल. त्यामुळे सागाच्या झाडाची किंमतही चांगली येईल साग शेतीमध्ये काही काळात अंतरपिके ही घेता येतील तसेच जनावरांच्याचार्याचीही लागवड करून त्यातून चांगले उत्पादन घेऊन बर्यापैकी उत्पन्न मिळाले. शेतकरी बंधुचा स्वत:चा गोठा असेल तर चार्याचा प्रश्न मिटेल.