टेस्ट ट्यूब बेबी या तंत्राचा वापर करून शेळीमध्ये शरीरबाह्य फलन आणि भ्रूण निर्मितीबाबत यशस्वी संशोधन करून अकोला येथील पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्थेच्या पशुप्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाने शेळीपालन या व्यावसायाला मोठे स्वरूप निर्माण करण्याचा नवा मार्ग दाखविला आहे. या प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या एका शेळीने नुकताच तीन करडांना जन्म दिला आहे. भविष्यात या संशोधनाचा लाभ आता शेती पालन व्यावसायातील शेतकर्यांना घेता येणार आहे.
व्यवसायात कमी कालावधीत अधिकची प्रगती करायची असेल तर उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत केले जाते. शेतीसह त्याच्या जोडव्यवसयात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. शेळीपालन हा व व्यवसाय सामान्य शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक आहे. शेती व्यवसाशी निगडीत असल्याने आता मराठवाडा, विदर्भ या भागात व्यवसयाचे प्रमाण हे वाढत आहे. पण पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथील पशुप्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाने जी किमया केली आहे त्यामुळे व्यवसायाला अधिक मोठे स्वरुप मिळणार आहे.
टेस्ट ट्यूब बेबी या तंत्राचा वापर करून शेळीमध्ये शरीरबाह्य फलन आणि भ्रूण निर्मितीबाबत यशस्वी संशोधन करण्यात आले. संस्थेच्या परीसरात एका शेळीने तीन करडांना जन्म दिला. त्यामुळे या संशोधनाचा लाभ आता इतर व्यवसायिकांनाही घेता येणार आहे. शेळ्यांची उत्पादकता तशी सहा महिन्यांनी होतेच पण व्यवसायिकांना याचे उत्पादन वाढवून अधिकचा फायदा कसा करुन देती येईल त्याअनुशंगाने या संस्थेने घेतलेला पुढाकार नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
असे केले संशोधन : या माध्यमातून गर्भधारणा तशी धोक्याची होती. पण पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथील संशोधकांनी ही प्रयोग यशस्वी करुन दाखवली आहे. संशोधनाबाबत प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. चैतन्य पावशे यांनी सांगितले, की शरीरबाह्य फलन आणि भ्रूणनिर्मिती प्रयोगासाठी कत्तलखान्यातून शेळ्यांची बिजांडे आणली. त्यातील स्त्रीबीजकोषातून स्त्रीबीजे बाहेर काढली. त्यांना प्रयोगशाळेत योग्य माध्यमात परिपक्व करून फलन माध्यमात शुक्राणू सोबत फळवली गेले. फलन माध्यमात शुक्राणू टाकण्याआधी वीर्यातील नको असलेले घटक काढून त्यावर उपचार केले. योग्य तेच शुक्राणू फलन माध्यमात स्त्रीबीजासोबत सोडण्यात आले. भ्रूण प्रत्यारोपणक्षम होईपर्यंत दोन ते तीन दिवस प्रयोगशाळेत योग्य माध्यमात इन्क्यूबेटरमध्ये ठेवण्यात आले. 60 ते 72 तासांनंतर 4 ते 8 पेशी असलेले भ्रूण शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपणक्षम भ्रूण दाई शेळीमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. यासाठी दाई शेळ्यांची निवड पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरून करण्यात आली. प्रत्यारोपित केलेल्या शेळ्यांची गर्भ तपासणी करण्यात आली. यामध्ये सहापैकी एका शेळीने 150 दिवसानंतर तीन करडांना यामध्ये 2 नर व 1 मादी जन्म दिला आहे.
हेही वाचा :
आता शेंळ्यांमध्येही कृत्रिम रेतन !
उस्मानाबादी शेळीची अशी घ्या काळजी
अबब… बारा लिटर दूध देणारी शेळी ! राज्यात धवल क्रांती घडवणार
शेळ्यांच्या उत्पादन वाढीसाठी… !
प्रक्रिया किचकट पण व्यवसायिकांच्या फायद्याची : टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे हा प्रयोग तसा किचकट आहे पण या करिता पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथील संशोधकांनी अथक परीश्रम आणि संशोधन केले होते. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे शेळीपालन व्यवसयातून अधिकचे उत्पादन तर होणारच आहे शिवाय यामध्ये नर करडे जन्माला येतील यासाठी अधिकचे प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेळ्यावर हा प्रयोग करण्यात आला नसला तरी भविष्यात नक्कीच व्यवसायिकदारांना याचा फायदा होणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा