थकीत वीज बिलापोटी शेतकर्यांची वीज तोडण्याची मोहीम सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले, पाणी असूनही पीक करपू लागली. त्यामुळे याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने, रस्तारोको करण्यात येत असताना अखेर वीज तोडणीसंदर्भात ठाकरे सरकारने घोषणा केली. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सभागृहात वीज तोडणी तीन महिन्यासाठी थांबवण्याची घोषणा केली. विशेषत: त्यांनी तोडलेली वीज पुन्हा जोडण्याच्या सुचनाही संबंधीतांना केल्या आहेत.
यामुळे शेतकरी आंदोलनाला मोठे यश आले आहे. वीज तोडणी मोहीमेमुळे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात यावरून मोठा वाद निर्माण झाला. वीजतोडणीचा मुद्दा सभागृहात गाजला, विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अनेक शेतकऱ्यांनी यामुळे आत्महत्या केल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. विविध सत्ताधारी पक्षातील आमदारांनी, विरोधी पक्ष, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनीही आवाज उठवला होता आणि ही वीज तोडणी त्वरीत थांबवावी अशी मागणी केली होती.
यामुळे आता शेतकरी आपली हातातोंडाला आलेली पीक जगवू शकणार आहेत. शेतकऱ्यांच्या हातात पीक येइपर्यंत वीज तोडणी थांबवली आहे. कृषी ग्राहकांना दिवसभरात वीज मिळावी यासाठी समिती नेमली आहे ते एक महिन्यात अहवाल देतील अशीही माहिती नितीन राऊत यांनी सभागृहात दिली आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये दहा दिवस आंदोलन केले होते. आता याबाबत देखील निर्णय होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
यंदा कसा असेल उन्हाचा चटका… काय आहे तापमानाचा अंदाज ?
हमीभावाने 6.89 लाख टन हरभरा खरेदीचे उद्दीष्ट
दरम्यान मागच्या सरकारने वीज बिल दिली नाही. बँकेचे कर्ज असल्यामुळे महावितरणची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करावा लागला होता, असेही सांगण्यात आले आहे. असे असले तरी या काळात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे अनेकांचे उत्पन्न घटले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇