केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता मिळणार असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.
धक्कादायक : अमेरिकेने वर्तविला भारतीय मान्सूनबाबत हा अंदाज
पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6.000 रुपये देते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकारकडून 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 12 व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती. तर आता शेतकरी आतुरतेने 13 व्या हप्ता कधी येणार याची वाट पहात आहे.
सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केले आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यावरच त्यांना हप्ता मिळणार आहे. त्याशिवाय त्यांचा हप्ता येणार नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण 12 हप्ते जमा झालेत आणि आता 13 हप्ता 27 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ई-केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळाला नव्हता. आता त्या शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याची आणि 13 व्या हप्त्याची रक्कम मिळून 4 हजार रुपये खात्यावर जमा होणार आहेत.
महत्त्वाची माहिती : शाश्वत शेतीमध्ये सेन्द्रीये कर्बाचे महत्व

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1