राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी खुद्द राज्यातील खरीपाची सध्यस्थिती काय आहे ? या संदर्भात माहिती देवून, शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन केले आहे.
ते म्हणाले, राज्यातील खरीप हंगामाचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने प्रत्यक्षात 20.60 लाख हेक्टर म्हणजे 14 टक्के पेरणी झाली आहे. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व खताचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मोठी घोषणा : राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर : 8 हजार 562 कोटीची मान्यता
चालू खरीप हंगामाकरिता राज्यास 19.21 लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे सांगून ते म्हणाले, राज्यासाठी 15 लाख 92 हजार 466 क्विंटल म्हणजे 82 टक्के बियाणे उपलब्ध झाली आहेत.

खरीप हंगामासाठी 43.13 लाख मे. टन खताच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून, आत्तापर्यंत 44.12 लाख मे. टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 16.53 लाख मे. टन खताची विक्री झाली असून सद्यस्थितीत राज्यात 27.58 लाख मे. टन खताचा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शुभवार्ता : अंडी उत्पादनात भारत नंबर 3 वर
राज्यात 3 जुलै पर्यंत 140.9 मिमी. पाऊस झाला असल्याचे सांगून ते म्हणाले, राज्यात सरासरी पर्जन्यमानाच्या 239.6 मिमी. म्हणजे 58.8 टक्के इतका पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार बियाणांची व खतांची खरेदी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यात नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेला सन 2027-28 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगून ते म्हणाले, या योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेत 1920 कोटी 99 लाख इतक्या आर्थिक तरतुदीस मान्यता देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाची बातमी : कांदा भाव खाणार !

https://www.facebook.com/shetimitramagazine03