राज्यात मागील काही दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा शेतकऱ्यांना बसला असून अजून काही ठिकाणी अवकाळी पाऊस नुकसान करीत आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री सत्तार यांनी आपला मोबाईल नंबर जाहीर केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती आपल्या मोबाइल क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन राज्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
मोठी बातमी : शेतकरी लाँग मार्च अखेर स्थगित : लाल वादळ माघारी
मागील आठ दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा शेतकऱ्यांना बसतो आहे. राज्याच्या विविध भागात गारपीट आणि वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पीक हातचे गेले आहे. तसेच झाडे उन्माळून पडणे, वीज पडून मृत्यू होणे, जनावर दगावणे, वीजपुरवठा खंडित होणे, असे प्रकार राज्यभर घडत आहेत. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधीपक्षाने केली आहे.
या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वत:च्या बंगल्यावरील आणि कार्यालयातील मोबाइल नंबर जाहीर केले आहेत. 9422204367 हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे. तर 022-22876342 व 022-22875930 हे दोन कृषिमंत्र्यांच्या कार्यालयातील संपर्क क्रमांक आहेत. तर कृषिमंत्री सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानाचा संपर्क क्रमांक 022-22020433 हा आहे. या क्रमांकवर शेतकऱ्यांनी नुकसान आणि वादळी पावसाची माहिती व फोटो नंबरवर पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मोठी घोषणा : शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी : मुख्यमंत्री शिंदे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1