कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील 198 शेतकऱ्यांचा 2 मे रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने नाशिक येथे विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामधील कृषी पुरस्कार मिळालेल्या तीन शेतकऱ्यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे.
महत्त्वाची बातमी : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ; काय होणार परिणाम ?
समीर डोंबे (खोर, पुणे), विनोद जाधव (सातमाने, नाशिक) व प्रल्हाद गवारे (चिंचवडगाव, बीड) या तीन शेतकऱ्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली असून, ही रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
अंजिर उत्पादनात त्यांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर या गावातील युवा शेतकरी समीर डोंबे यांना वंसतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. त्या पुरस्काराची रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे. सध्या पैशाची गरज ही मझ्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आहे. या माध्यमातून समाजात एक चांगला संदेश जावा यासाठी मी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पुरस्काराची रक्कम दिल्याची माहिती समीर डोंबे यांनी बोलताना दिली. ज्या क्षेत्रातूम मी येतो, त्या क्षेत्राला आपण काहीतरी देणं लागतो. नोकरी सोडून मी शेती करत आहे. या क्षेत्रातून, पैसा, प्रसिद्धी मिळाली. शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षण घेत असताना अनेक अडचणी येतात, त्यावर त्यांना मात करता यावी, यासाठी हा निर्णय घेतला. असल्याचे डोंबे यांनी म्हंटले आहे.
महत्त्वाची बातमी : आता उसापासून तयार होणार जाम !
डाळिंब आणि शेवग्यामध्ये उल्लेखनीय काम करणारे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सातमाने गावातील पुरस्कार प्राप्त शेतकरी विनोद जाधव यांनी ही पुरस्काराची रक्कम देताना सांगितले की, सध्या राज्यातील शेतकरी विविध संकटाचा सामना करत आहे. आमच्याकडे जरा चांगले उत्पादन होते. मोठ्या प्रमाणावर फळबागा आमच्या भागात आहेत. माझ्याकडे डाळिंब आणि शेवग्याची बाग आहे. यातून चांगले उत्पन्न मिळते. चांगल्या कामात आपला हातभार लागावा म्हणून ही पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता मे महिन्यात ?
तसेच बीड जिल्ह्यातील चिंचवडगाव येथील शेतकरी प्रल्हाद गवारे यांनाही कृषी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांनी देखील पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे.
हे नक्की वाचा : देशात विद्राव्य खतांची टंचाई : दर वाढले
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1