बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्ह्णून ओळखला जातो. सर्वोच्च न्यायालायने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली त्यानंतर आता देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही पुणे जिल्ह्यात भरवण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा ‘रेकॉर्ड ब्रेक’उत्सव होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून, बैलगाडा मालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. दि. २८ मे ते ३१ मे २०२२ सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत अत्यंत काटेकोरपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही शर्यत पार पडणार आहे.
मान्सून अपडेट : विदर्भात यलो अलर्ट : पुढचे दोन दिवस पाऊस !
देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीसाठी ‘टोकन बूक’ प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी टोकन बंधनकार आहे. गुरूवारी, रामायण मैदानावरील सभागृहात सकाळी ९ ते १२ या दरम्यान टोकन स्विकारण्यात आले. अवघ्या तीन तासांत २ हजाराहून अधिक बैलगाडा मालकांनी टोकन नोंदणी केली. एवढ्या कमी वेळात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्येने टोकन बूक होणारी ही इतिहासातील पहिली बैलगाडा शर्यत असल्याचं म्हटलं जात आहे.
आनंदाची बातमी : पुरंदर येथे मध पोळे चाचणी प्रयोगशाळा सुरु
या टोकनमधून ‘लकी ड्रॉ’ काढून शर्यतीचे नियोजन करण्यात येणार आहे. एका बॉक्समध्ये २ हजार नावांच्या चिठ्ठया असतील. त्यात ज्याची पहिली चिठ्ठी येईल तो बैलगाडा पहिल्यांदा धावणार, असे नियोजन केले आहे. टोकनची रक्कम ही घाटात गाडा जुंपल्यावर परत दिली जाईल. असे राहुल सस्ते यांनी सांगितले.
हे वाचा : शेतकऱ्यांना टोमॅटोची लॉटरी : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
घाट एकूण १२ सेकंदाचा आहे. त्यानुसार डिजिटल घड्याळाच्या मदतीने बैलगाडा किती सेकंदात शर्यत पूर्ण करतो याची नोंद केली जाते. या घाटात साधारण २ हजार बैलगाडा धावणार असून यापैकी पहिल्या १२० गाडा मालकांना दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे. सेमी फायनल आणि फायनलमध्ये धावणाऱ्या बैलगाडा मालकांना जेसीबी, बुलेरो, ट्रॅक्टर आणि रोख पारितोषिक अशा बक्षीसांसाठी शर्यत होणार आहे.
मोठी बातमी : नाफेड हमीभाव खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी अचानकपणे थांबवली
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1