मराठवाड्याला रेशीम हब बनविण्याच्या दिशेन पहिले पाऊल जालना जिल्ह्याने उचलले आहे. अंडीपुंज निर्मितीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या जिल्ह्यात कोष ते कापडनिर्मितीच्या दिशेने झपाट्याने तयारी सुरू आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत हे प्रत्यक्षात येण्याची चिन्ह आहेत. जालन्यात काम शेवटच्या टप्प्यात व सर्व सोयींनी युक्त असलेल्या स्वतंत्र रेशीम कोष बाजारपेठ इमारत मैलाचा दगड मानली जात आहे.
महत्त्वाची बातमी : वातावरणीय बदलांवर उद्यावर नाही आजच कामची गरज : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
महाराष्ट्राचा बायव्होल्टाइन रेशीम कोष उत्पादक राज्य म्हणून नावलौकीक झाला आहे. गतवर्षीपासून राज्याने पारंपारिक बायव्होल्टाइन कोष उत्पादक राज्य म्हणून ओळख असलेल्या जम्मू- काश्मीरला मागे टाकले आहे. 100 टक्के बायव्होल्टाइन रेशीम कोष उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होते आहे. राज्याचे यंदाचे रेशीम कोष उत्पादन 3356 टन झाले आहे. बायव्होल्टाइनमुळे उत्तम सुताची खात्री, क्रॉस ब्रीडपेक्षा सील्क प्रमाण जास्त यामुळे राज्यातील, मराठवाड्यातील रेशीम कोषाला राज्याबाहेरील बाजारातही चांगली मागणी असते. हीच बाब हेरून रेशीम संचालनालयाच्या वतीने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून मराठवाड्याला रेशीम हब बनविण्याचे प्रयत्न चालविले होते. त्याची फळ आता काही प्रमाणात दिसू लागली आहेत.
लक्षवेधी बातमी : वाढत्या तापमानाचा शेती पिकांवर परिणाम
जालना जिल्ह्यात सप्टेंबर 2019 मध्ये जालना येथे रामनगरमच्या धर्तीवर मिनी रेशीम कोष बाजरपेठेच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. जवळपास 6 कोटी 13 लाख रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या या स्वतंत्र बाजारपेठेच्या इमारतीत रेशीम कोष खरेदी विक्री हॉल, व्यापाऱ्यांना कोष साठविणे व राहण्याची सुविधा, कॅंटीनची सोय, प्रशिक्षण हॉल, प्रशासकीय कार्यालय, ऑटोमॅटिक ड्रॉइंग युनिट, ककुन टेस्टिंग युनिट आदी अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.
महाराष्ट्रातील दुसरी व मराठवाड्यातील पहिली रेशीम कोष बाजाराची ही स्वतंत्र इमारत असेल. या इमारतीचे बांधकाम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. इलेक्ट्रिसिटीचे काम बाकी असल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली. रेशीम कोष बाजारपेठेची स्वतंत्र इमारत पूर्ण झाल्यास बाजारपेठ, इनक्युबेशन सेंटर, अंडीपुंज निर्मिती, चॉकी, बायव्होल्टाइन कोष उत्पादन, दोन ऑटोमॅटिक रेलिंग युनिट आदी टप्पे जालना जिल्ह्यात पूर्ण होतील. याशिवाय निर्मित धाग्याला पिळ देणे, रंग देणे व त्यानंतर वस्त्रनिर्मिती करणे आदी कामे येत्या दोन वर्षांत पूर्णत्वास जातील, अशी आशा रेशीम विभागाला आहे.
आनंदाची बातमी : यंदा मान्सून वेळेआधी
सद्यःस्थितीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात सुरू असलेल्या रेशीम कोष बाजारपेठेत नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक वर्षात जवळपास 462 टन रेशीम कोषाची विक्री झाली. त्यातून 23 कोटी रुपयांची उलाढाल झाली. जवळपास 23 लाखांचे उत्पन्न बाजार समितीला यामधून प्राप्त झाले. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू आदी राज्यांतील जवळपास 8 ते 10 व्यापारी या सर्व कोष खरेदीच्या प्रक्रियेत सहभागी होत असल्याची माहितीही जालना रेशीम विभागाच्या वतीने देण्यात आली.
हे वाचा : कोविड बाधित महिलांना मोफत बियाणे, खते : नीलम गोऱ्हे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1