ट्रॅक्टर उत्पादक सोनालिका ने भारतातील पहिले फार्म-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ‘टाइगर इलेक्ट्रिक’ बाजारात आणला आहे. हा ट्रॅक्टर जर्मनबनावटीचा असला तरी त्याची निर्मिती भारतात करण्यात आली आहे. कंपनीने या ट्रॅक्टरची बुकिंगही सुरू केले आहे.
टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये अत्याधुनिक आयपी 67 अनुरूप 25.5 किलोवॅट नैसर्गिक कूलिंग कॉम्पॅक्ट बॅटरी असून, हा ट्रॅक्टर एकदा चार्ज केला की, आठ तास चालणार असून तब्बल 24 किलोमिटर धावणार आहे. सोनालिका टायगरची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
भारतीय शेतकर्यांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे सोनालिका समूहाचे कार्यकारी संचालक रमण मित्तल यांन सांगितले. 2030 पर्यंत भारतातील विद्युत वाहने सुरू करण्याच्या भारत सरकारच्या उद्दीष्टातही हा टॅक्टर एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची रचना युरोपमध्ये तयार केली गेली आहे. हे पंजाबच्या होशियारपूरमध्ये सोनालिकाच्या इंटिग्रेटेड ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग सुविधेमध्ये तयार केले गेले आहे. मित्तल म्हणाले की, शेतकऱ्यांना टायगर इलेक्ट्रिक वापरणे सोपे होईल. इंधनाची किंमत देखील फार कमी आहे.
सोनालिका टायगर ईलेक्ट्रिक कंपनीने IP67 मानकच्या 25.5 kW ची क्षमतेचं नैसर्गिक कूलिंग कॉम्पॅक्ट बॅटरीचा केला आहे. या ट्रॅक्टरचं सर्वात मोठं वैशिष्ट्ये आहे ते म्हणजे, डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत एक चतुर्थांशपेक्षाही कमी खर्च लागत असतो. कंपनीनुसार, या ट्रॅक्टरला घरगुती सॉकेटनेही चार्ज केलं जाऊ शकतो आणि फक्त १० तासात पूर्णपणे चार्ज होतो. दरम्यान यात वापरण्यात आलेलं जर्मन ईलेक्ट्रिक मोटरमुळे आपल्याला शंभर टक्के टॉर्क मिळत असते. दरम्यान, कंपनी फास्ट चार्जिंह सिस्टमपण देते. ज्याच्या साहाय्याने ट्रॅक्टरच्या बॅटरीला फक्त ४ तासात पुर्ण चार्ज करता येते. हा ट्रॅक्टर २ टन ट्रॉलीसह काम करताना २४.९ किमी प्रति तास टॉप स्पीड आणि ८ तास बॅटरी बॅकअप देतो. सोनालिका ट्रांसमिशन असल्याने हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण हा जास्त गरम होत नाही.