हवामान बदलाचा मोठा परिणाम वातावरणात झाला असून, भर उन्हाळ्यातही निसर्गाचा लहरीपणा सुरूच आहे. गेल्या आठवड्यातील ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात वातावरणातील उष्णतेमध्ये वाढ झाल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाचा धोका टळलेला असला तरी सध्या अरबी समुद्रात सध्या चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तसेच उष्ण लाट क्षेत्रामध्ये वारा वहनातील खंडन याच्या परिणामामुळे महाराष्ट्रात महिन्याच्या अखेरीस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवलेला आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
वाढली द्राक्षाला तडे जाण्याची भीती
टोमॅटोचे दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीत
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. याचा परिणाम मध्य महाराष्ट्रात झाला आहे. दोन दिवसांपूर्वी काही भागात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तर आता पश्चिम विदर्भ, कोकण, गोवा या ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. तर उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले गेले आहे. तापमानात कमी-अधिकचा फरक असला तरी पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेची लाट राहणार आहे. याची चाहूल रविवारपासूनच जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवासाच्या तुलनेत रविवारी उकाड्यात वाढ झाली होती.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1