जमिनीचे आरोग्य वरचेवर बिघडत चालले असून, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाणे 0.5 टक्क्यांच्या खाली आले आहे. परिणामी जमिनीची उत्पादकता झपाट्याने कमी होताना दिसत आहे. शेतात कितीही खर्च करून अपेक्षीत उत्पादन मिळत नाही. त्याचे मुळ कारण जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे कमी झालेले प्रमाण हेच आहे. त्यामुळे आता जमिनीमधील सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे झाले आहे. किंवा त्या शिवाय पर्यायच उरलेला नाही. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यासाठी कोंबडी खत हा उत्तम पर्याय असून, इतर खताच्या तुलनेत सर्वपातळीवर कोंबडी खताची जादू मोठी आहे.
कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतीक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते. कोंबडी खताचा वापर हा बागायती क्षेत्रासाठी चांगला होतो. कोंबडी खताचा विचार केला तर या खताची प्रत ही कोंबडीची जात, वापरण्यात आलेले लिटरचे साहित्य, कोंबडीचे खाद्य, जागा व पाण्याचा वापर यासारख्या घटकांवर अवलंबून असतो.
कोंबडी खतामध्ये 13 प्रकारचे अन्नद्रव्ये असतात. त्यामध्ये नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असते. कोंबडी खतातील नत्र हे अमोनिया, नायट्रेट, यूरिक अॅसिड या प्रमाणात आढळते. शिवाय कोंबडी खतामधून मुख्य अन्नद्रव्या व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सोडियम, बोरॉन, झिंक, कॉपर इत्याची अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
चांगल्या दर्जाच्या कोंबडी खताचा रंग भुरकट, काळपट असतो. तर सामू साडेसहा ते साडे सात दरम्यान असतो. कणांचा आकार पाच ते दहा मी.मी असतो. दर्जेदार कोंबडी खतामधील कर्ब नत्र गुणोत्तर प्रमाण 1:10 ते 1:20 दरम्यान असते. तर जलधारणशक्ती टक्क्यापेक्षा जास्त असते. असे गुणधर्म असलेले कोंबडी खत मातीचा कर्ब वाढवण्यासाठी सर्वोत्तम असते.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
काय आहे माती परिक्षणाचा मुलमंत्र ?
पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य
पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करा गांडुळ खताचा वापर
सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी पेंडीचे फायदे
कोंबडी खत मुळातच उष्ण असते. त्यामुळे ते पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर मशागतीच्या वेळी शेतात टाकून जमिनीत मिसळून घ्यावे. त्यानंतर कुळवाची पाळी द्यावी. ताजे कोंबडी खत उभ्या पिकांना कधीही देवू नये, किंवा जमिनीत मिसळू नये. जर उभ्या पिकाला कोंबडी खत द्यायचे असेल तर ते एक महिना अगोदर पाणी शिंपडून थंड होऊ द्यावे. त्यानंतरच ते उभ्या पिकात किंवा जमिनीला द्यावे. असे केल्यामुळे त्याचे कर्म नत्र गुणोत्तर स्थिर होते. त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. उभ्या पिकात कोंबडी खत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. ओलावा नसल्यास पीक पिवळे पडण्याची शक्यता असते. जमीन व पीक लागवडी नुसार प्रती एकरी पाच ते 20 टन कोंबडी खताचा वापर करावा.
संदर्भ : शेतीमित्र (सेंद्रिय शेती विशेषांक)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 आमचे इंस्टाग्राम पेजला फॉलोव्ह करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇