• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतीमित्र by शेतीमित्र
June 27, 2022
in शेतीच्या बातम्या
0
राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
0
SHARES
0
VIEWS

राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या दूरदृश्य बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला.

कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा याविषयी महत्वाच्या सूचनाही केल्या. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेऊ नका, ती तातडीने माझ्याकडे घेऊन या असेही त्यांनी निर्देश दिले.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला. कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू लागला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात मास्क घालणे आवश्यक आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांपर्यंत कोरोना पोहचू नये म्हणून अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लोकल रेल्वे प्रवासात मास्क सक्ती करावी किंवा नाही याबाबत तसेच अन्य कोरोना नियमावली लागू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

महत्त्वाची माहिती : ई-पीक पाहणी ॲपवर 90 लाख शेतकऱ्यांची नोंदणी

राज्यातील कोरोना स्थितीबद्दल आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी माहिती दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता कोरोना रुग्ण आहे. राज्यात साधारणतः २५ हजार रूग्ण आहेत. त्यापैकी ९५ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. पाच टक्के रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातील संख्या कमी असली तरी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनवर एक टक्के तर आयसीयूमध्ये अर्धा टक्के रुग्ण आहेत. व्हेंटीलेटरवर आजमितीस २५ रुग्ण आहेत असे सांगून वर्धक मात्रा वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी नाशिक, पुणे, अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी देखील कोरोना उपाययोजनांची माहिती दिली.

मुंबई महापालिकेचे प्रशासक  डॉ आय. एस चहल यांनी सांगितले की, मुंबईत दररोज २० हजाराच्या वर चाचण्या करण्यात येत असून आज २४७९ रुग्ण आढळले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या १३ हजार ४०० इतकी आहे. मुंबईत सध्या १२ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील नालेसफाई तसेच मलेरियाचा प्रादुर्भाव याविषयी माहिती घेऊन सूचनाही केल्या.

महत्त्वाची घोषणा : राज्यात कृषी संजीवनी मोहीम सुरु

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजनांबाबत देखील मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी  विशेषतः कोकण विभागातील तयारी आणि सज्जता याबाबत कोकण विभागीय आयुक्त यांनी माहिती दिली. दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वेळीच देण्यात याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरी, महाड, खेड आणि चिपळूण परिसरांबाबत आतापासूनच विविध यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याची तसेच अतिवृष्टी आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क यंत्रणा सुरळीत राहावी यासाठी उपाययोजना,  सॅटेलाईट- रेडीओ संपर्क यंत्रणा, तसेच मोबाईल चार्जिंगकरिताही व्यवस्था, पाटबंधारे विभागाची पाणी सोडण्याबाबत तसेच  आपत्कालीन परिस्थितीत सायरनद्वारे सूचना देण्याची यंत्रणा, वापरण्यात येणाऱ्या बोटींची चाचणी याविषयी माहिती देण्यात आली.

मान्सून अपडेट : मान्सून रेंगाळला : सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा

आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यात एकाच दिवशी सात ते आठ लाख वारकरी एकत्र आल्याची माहिती  देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वारीत सहभागी दिंडी प्रमुखांशी संवाद साधण्याची सूचना केली. त्यांना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य समजावून द्या. वारीत वारकरी मंडळी देहभान हरपून सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करण्यात यावी. विशेषतः मास्क वापरणे, वारीच्या मार्गावर स्वच्छता, शक्य आहे तिथे शौचालयांची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा याबाबतीत जाणीवपूर्वक काळजी घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील पीकपाणी आणि पावसाबाबतही कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी माहिती दिली. राज्यात 13 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून गेल्या वर्षी याच सुमारास 23 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. विखुरलेल्या परिस्थितीत पाऊस पडत आहे. बियाणे खतांची उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नाही. एक जुलै रोजी कृषी दिन आहे. त्याआधी 25 जून ते 1 जुलै हा कृषी संजीवनी सप्ताहही आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये गावांगावामध्ये कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसाराबाबत माहिती देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाची अनिश्चितता लक्षात घेता पेरण्या करण्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असे सांगितले.

महत्त्वाचा सल्ला : शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करू नये ; कृषी आयुक्तांचा सल्ला

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: Disaster alert systemsOverview of crop water and rainfall in the stateReview of the increasing corona incidence in the stateSowing on an area of 13 lakh hectares in the stateThe uncertainty of politics and rain alwaysआपत्तीत यंत्रणांनी सतर्क ठेवण्याचे निर्देशराजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितताराज्यात 13 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीराज्यातील पीकपाणी आणि पावसाचा आढावाराज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा आढावा
Previous Post

ई-पीक पाहणी ॲपवर 90 लाख शेतकऱ्यांची नोंदणी

Next Post

खात्यांचे फेरवाटप : शंकरराव यशवंतराव गडाख यांच्याकडे कृषी खाते

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
खात्यांचे फेरवाटप : शंकरराव यशवंतराव गडाख यांच्याकडे कृषी खाते

खात्यांचे फेरवाटप : शंकरराव यशवंतराव गडाख यांच्याकडे कृषी खाते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230541
Users Today : 15
Users Last 30 days : 1298
Users This Month : 140
Users This Year : 4871
Total Users : 230541
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us