दक्षिण भारतामधील ईशान्य बाजूकडील पुन्हा एकदा वारे सक्रिय झाले असल्यामुळे दक्षिण तमिळनाडू तसेच पोंडेचरी, कराईकल, दक्षिण केरळ व माहे परिसरामध्ये पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. येणाऱ्या 24 तासांमध्ये दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ भागामध्ये विजांचा कडकडाटसह जोरात पाऊस पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच संबंधित राज्यात अनेक ठिकाणी आज हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे.
मागील काही दिवसांपासून उत्तर भारत विभागामध्ये पाऊसाने तसेच हिमवृष्टीने चांगलीच धो-धो लावलेली होती मात्र आता पण आता उत्तर भारतातील पाऊसाने थोडी विश्रांती घेतली असल्यामुळे थंडीचा कडाका सुद्धा कमी झालेला आहे. परंतु आता अचानक इशान्य बाजूकडील वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे पाऊस पडण्यासाठी पोषक वातारण निर्माण झाले आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्हांना जाणवणार आहे.
या जिल्ह्यात कोसळणार पाऊस : अचानक वातावरण बदलाच्या परिस्थितीचा काहीसा परिणाम महाराष्ट्र राज्यावर देखील होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात राज्यामध्ये कोरडे हवामान राहणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. तर 18 फेब्रुवारी रोजी हवामान खात्याने नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तसेच गडचिरोली या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे. या 5 जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार असून, हलक्या तसेच मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचे सांगितले गेले आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भ भागामध्ये किमान तसेच कमाल तापमानामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली असून, तिथे गरमी चे प्रमाण देखील वाढले आहे.
या जिल्ह्यात तापमान वाढले : महाराष्ट्र राज्यात काही भागात थंडीचा जोर ओसरला असल्यामुळे किमान व कमाल तापमानात वाढ झालेली आहे. तर आज महाबळेश्वर मध्ये 14.6 तसेच सातारा मध्ये 14.7, सोलापूरमध्ये 15.5, कोल्हापूरमध्ये 18.1, सांगलीमध्ये 16.7, जळगावमध्ये 10.0, मालेगावमध्ये 11.0, पुण्यात 13.0, बारामतीमध्ये 12.4, नाशिकमध्ये 11.7, परभणीमध्ये 13.6, जालन्यात 14.3, उस्मानाबादमध्ये 14.0, चिखलठाणामध्ये 12.0, नांदेडमध्ये 13.4, मुंबईमध्ये 19.0, डहाणूमध्ये 17.9, ठाण्यात 20.0, माथेरानमध्ये 18.6, हरनाईमध्ये 21.8आणि रत्नागिरीत 19.7 अंश अशा प्रकारे किमान तापमानाची नोंद झालेली आहे.
4-5 अंश तापमान वाढणार : यासोबतच येत्या 4 दिवसांमध्ये वायव्यकडे बहुतांश भागामध्ये किमान तापमानात 2-4 अंश डिग्री सेल्सिअस तापमान वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. तर पुढील 4-5 दिवसामध्ये बऱ्याच भागात 3-5 अंश डिग्री सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. येईल या काही काळामध्ये वायव्य तसेच मध्य भारतामध्ये थंडीचा जोर कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात व मार्च च्या पहिल्या आठवड्यात तापमानात चांगलीच वाढ होईल, तसेच ही वाढ दिवसेंदिवस होणार असल्याने या वेळीचा उन्हाळा चांगला कडाक्याचा जाणार आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
श्री दत्त कारखान्यात झाले शुगर बीटचे गाळप !
जीआय मिळालेल्या फळामधील वाढत्या बनवेगिरीला आळा घालणार ?
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत झाली कमालीची वाढ
सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी कोंबडी खताची जादू
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी बॉक्सवर क्यूआर कोड
पंजाब डख यांचा अंदाज : दरम्यान हवामान तंज्ज्ञ पंजाब डख यांनी 15 ते 17 दरम्यान विदर्भ, पूर्वविदर्भ व मराठवाड्यात ढगाव वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यात रात्रीची थंडी रहाणार आहे. तसेच सातारा सांगली नगर औरंगाबाद जालना जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर सोलापूर उस्मानाबाद बिड लातूर परभणी जालना नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली भागात तिन दिवस ढगाळ वातावरण राहील. यामुळे परत या भागात धुई धुके येइल. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. दिवसा उन्हाचा चटका वाढण्यास सुरवात होइल 28 फेब्रूवारी पर्यंत रात्रीला थंडी राहील. उर्वरीत भागात हवामान कोरडे राहील.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇