यंदा राज्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सलग दीड महिन्यापासून राज्यात पावसाची संततधार असल्याने पिके पाण्यात गेली आहेत. केवळ पिकांचेच नाहीतर घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दरम्यान, विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरु झाले असून, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी प्रमुख मागणी विरोधकांकडून केली जाणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
फायद्याच्या टिप्स : असे करा उसावरील हुमणीचे नियंत्रण
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. भविष्यातही कोणत्या पिकाची शाश्वती नाही असे असतानाही राज्यात अजून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती आणि त्यांच्या व्यथा जाणून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्वतोपरी मदत देणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा हीच आमची मागणी असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठणकावून पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. आता कालपासून सुरु झालेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मदत हाच मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.

महत्त्वाच्या टिप्स : सिताफळवरील या तीन किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील तब्बल 15 लाख हेक्टराहून अधिकच्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आढावा घेऊन नुकसानभरपाईचे स्वरुप कसे असणार हे स्पष्ट केले आहे. सध्याच्या स्थितीनुसार जिरायती क्षेत्राल हेक्टरी 75 हजार रुपये तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी 1 लाख 50 हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे वाढीव मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की विरोधकांच्या मागणीनुसार ओल्या दुष्काळाची घोषणा होणार हे पहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या टिप्स : का आहे सोलापूर लाल डाळींब नंबर 1

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1