कोरोना महामारी, रशीया-युक्रेन युद्ध यामुळे भडकलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता अक्षरश: होरपळून निघाली आली. या महगाईमुळे देशातील सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच स्तरातून मागणी होत आहे. याचे मुख्य कारण असलेल्या पेट्रोलीयम पदार्थांच्या वाढलेल्या किमती जोपर्यंत कमी होणार नाहीत, तो पर्यंत या महागाईवर नियंत्रण आणणे अशक्य झाले आहे. असे असताना सर्वांसाठीच दिलासादायक बातमी समोर येत आहे. कारण लवकरच पेट्रोल, डिसेलच्या किमती कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
मोठा निर्णय : ऊस तोडणी व वाहतूक खर्चाचे दरपत्रक जाहीर
याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे गुजरातची निवडणूक ! सध्या गुजरातची निवडणूक तोंडावर आली असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची घोषणा करण्याची शक्यता असून, दरम्यान या किमती कमी करण्यासाठी पोषक वातारणही निर्माण झाले आहे. कारण सध्या रशियाकडून भारताला अगदी स्वस्तात म्हणजे एक चतुर्थांश किमतीत कच्चे तेल मिळत आहे. यामुळे गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपातीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आनंदाची बातमी : नागपूर येथे 25 ते 28 नोव्हेंबर ‘अॅग्रोव्हिजन’चे आयोजन
दरम्यान, सध्या इराककडून देखील स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळत आहे. कंपन्यांचा वाढता नफा लक्षात घेता पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 रुपये कपात केली जाऊ शकते. अमेरिका व युरोपियन देश रशियाच्या तेलाच्या किमती निश्चित करणार आहे. याचा भारताला फायदा होणार आहे. इराकनेही भारतासाठी तेलाच्या किमती घटविल्या आहेत. इराक रशियापेक्षा 9 डॉलरने कमी दरात कच्चे तेल देत आहे. यामुळे याबाबत निर्णय होऊ शकतो. भारतात शेवटची इंधन दर कपात 22 मे रोजी झाली होती. तेव्हा सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेल कंपन्यांनी मात्र दरांत कपात केलेली नव्हती. आता याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होईल.
मोठा निर्णय : या निर्णयामुळे ऊसाच्या कट्यातील फसवणूक थांबणार ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1