सध्या राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी परतीचा मान्सून सर्वसाधारण तारखेपेक्षा सुमारे पंधरा दिवस अगोदरच म्हणजेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने माहिती दिली आहे. दरम्यान राज्यात कालपासून सुरु झालेला पाऊस 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बातमी : ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या कृषी उत्पादनांवर भर द्या : नितिन गडकरी
यंदा पावसाने जूनच्या सुरुवातीला हुलकावणी दिली. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भात खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले. राज्यातील 26 जिल्ह्यात या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यातून वाचलेली पिके तिव्र उन्हामुळे सध्या सुकून चालली असल्याने सध्या शेतकऱ्यांना पावसाची गरज निर्माण झाली आहे. त्यातच काल पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश जवळपास सर्वच विभागात हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळं यंदा गणेशोत्मवामध्ये नागरिकांना पावसाचा सामना करावा लागणार आहे.
मोठी बातमी : लातूरमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची 85 लाखाची फसवणूक
आज सकाळपासून अने जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. 1 सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता असून, नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यात 31 तारखेपासून ते 5 सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच खानदेश मधील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. याशिवाय बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत गणरायाच्या आगमनाबरोबरच राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचे पुनरागमन होणार आहे.
महत्त्वाची बातमी : 1 सप्टेंबरपासून दूध महागणार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1