पोल्ट्री व्यवसायातील अडचणीमध्ये गेल्या काही दिवसात वाढ होत आहे. कोरोनाच्या काळात चिकन संदर्भात पसरलेल्या अफवांचा मोठा परिणाम या व्यवसायावर झाला. त्यामुळे मागणी एकदम थप्प झाली. त्यामुळे पोल्ट्रीधारकांना मोठा तोटा सहन करावा लागला. शिवाय त्यानंतर बर्ड फ्यू च्या वारंवार होणारा प्रादुर्भावामुळे पोल्ट्री धारकांचे मोठे नुकसान झाले. झालेले नुकसान सहन करीत शेतीपुरक असलेला हा व्यवसाय अत्ताकुढे तरी सुरूळीत होत असताना अचानक पोल्ट्री खाद्याच्या दरात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. यामुळे पोल्ट्री व्यवसायाचे गणितच चुकत असून, पोल्ट्री व्यावसायाला अक्षरश: कोलमडून पडला आहे. आता सरकारने पुढाकार घेतल्याशिवाय या व्यवसायाला उभारी येणे अशक्य असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पोल्ट्री व्यवसयात अंडी देणाऱ्या या पक्ष्यांचे खाद्य तयार करण्यासाठी सोयापेंड, शेंगपेंड, तांदळाचा भुस्सा, मासळी आणि शिंपले याचा वापर केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या खाद्यामध्ये तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति अंड्यामागे 1 रुपया 25 पैशाची नुकसान सहन करण्याची नामुष्की व्यवसायिकांवर आलेली आहे. पशूंचे खाद्य तयार करण्यासाठी सध्या प्रति किलो 28 रुपयांपर्यंत खर्च येत आहे. त्यामुळे व्यवसायात तग धरणे मुश्कील झाले आहे.
हेही वाचा : अखेर वीज तोडणीसंदर्भात ठाकरे सरकारने केली घोषणा !
पोल्ट्री व्यवसयात सर्वात महत्वाचे आहे ते पाणी आणि पशूंना खाद्य. सध्या उन्हळ्यात पाण्याची तर समस्या आहेच पण खाद्याचे दर गगणाला भिडलेले आहेत. खाद्यासाठी आवश्यक असलेले तांदूळ, गहू, सोयापेंड, मका यावर अनुदान दिले तरच त्याची खरेदी शक्य होणार आहे. मध्यंतरी सोयापेंडच्या बाबतीत अशीच मागणी व्यवसायिकांनी केली होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यावेळी सरकारने लक्ष दिले तरच हे व्यवसाय जिवंत राहणार आहेत असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : विदर्भात कापसाला 50 वर्षातील रेकॉर्डब्रेक दर !

कोंबड्यांना खाद्य तयार करण्यासाठी मका 25 रुपये, सोयापेंड 66 रुपये, शेंगपेंड 52 रुपये, तांदूळ भुस्सा 20 रुपये, मासळी 40 रुपये आणि शिंपले 60 रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यात पुन्हा औषधे, जीवनसत्त्वे आणि पोषक क्षारयुक्त अन्नाचा समावेश करावा लागतो. एकूण खाद्याच्या दरात 60-70 टक्के वाढ झाली आहे. दहा हजार पक्ष्यांमागे रोज 20 हजार रुपयांचा फटका पोल्ट्रीधारकांना बसत आहे. अंड्याचा विक्री दर वाढवावा अन्यथा अनुदान तरी द्यावे, तरच हा व्यवसाय टिकेल असे म्हणणे व्यवसायिकांचे आहे.
हेही वाचा : कांद्याला उतरती काळा
पशूंचे खाद्य तयार करण्यासाठी सोयापेंड, शेंगपेंड, तांदळाचा भुस्सा, मासळी, शिंपले आणि काही औषधांसह व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा वापर केला जातो. हे खाद्य तयार करण्यासाठी सध्या प्रति किलो 28 रुपयांपर्यंत खर्च येतो. यामध्ये मागील काही दिवसांत प्रति किलो खर्चात दहा रुपयांची वाढ झाली आहे. या पूर्वी खाद्याचा खर्च उत्पादनाच्या 80 टक्क्यांवर जात होता, तो आता 120 टक्क्यांवर गेला आहे. एका अंडयाचा उत्पादन खर्च 4 रुपये 50 पैसे आहे, तर विक्री 3 रुपये 40 पैशांनी होते आहे. प्रति अंड्यामागे सव्वा रुपये तोटा होत आहे. पशूखाद्याच्या वाढत्या दरामुळे पोल्ट्री व्यवसायाचे गणितच चुकत असून, पल्ट्री व्यावसाय अडचणीत आला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा