झपाट्याने वाढणाऱ्या महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आपल्या रेपो दरात वाढ केली आहे. याचा परिणाम आता बँकांकडून देखील कर्जदर वाढवण्यात येतील, असे बोलले जाते. व्याजदर वाढीमागे महागाई हाच कळीचा मुद्दा असून नजीकच्या काळात महागाईचा आणखी भडका उडेल, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिला.
लक्षवेधी बातमी : राज्यपालांच्या हस्ते कृषीरत्न पुरस्कार स्वीकारण्यास राजेंद्र पवारांचा नकार !
महागाईबाबत रिझर्व्ह बँकेनं यापूर्वी अनेकदा चिंता व्यक्त केली होती. करोना संकटात बँकेने दोन वर्ष पतधोरण स्थिर ठेवले होते. मात्र रशिया आणि युक्रेन युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या प्रचंड दरवाढीने वित्तीय तुटीचा समतोल बिघडला. भारताच्या आयात बिलात मोठी वाढ झाली. त्याशिवाय इंधन दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळला.
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी महागाईबाबत गंभीर भाष्य केले. ते म्हणाले की रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. महागाई नियंत्रणासाठी व्याजदर वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नजीकच्या काळात महागाई आणखी वाढेल, असा इशारा दास यांनी यावेळी दिली.
हे नक्की वाचा : भारतीय शेतकरी शेतीतून कमावतो तरी किती ? NSSO चा रिपोर्ट
रशिया-युक्रेन युद्धाने कच्च्या तेलाचा भाव 139 डॉलरपर्यंत वाढला होता. तो त्यानंतर कमी झाला मात्र तरिही तो 100 डॉलरवर आहे. याशिवाय खाद्य तेलाच्या आयातीला देखील फटका बसला आहे. देशात सुर्यफुल तेलाचा भाव 180 रुपये लीटर इतका आहे. इतर खाद्य वस्तू, भाजीपाला देखील महागच आहे.
वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने चालू आर्थिक वर्षासाठी 5.7 टक्के महागाई दराचे सुधारित उद्दिष्ट आरबीआयने ठेवले होते. फेब्रुवारी महिन्यात ते 4.5 टक्के होते. तर जीडीपीचा अंदाज 7.2 टक्क्यांपर्यंत कमी केला होता.
महत्त्वाची घोषणा : आमिर खानने केली शेतकऱ्यांसाठी या स्पर्धेची घोषणा
आधीच इंधन दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या वाहतूकदारांनी दरवाढीचे संकेत दिले आहेत. ओला, उबर या अॅप बेस्ड टॅक्सी ऑपरेटर्सनी यापूर्वीच भाडेवाढ केली आहे. सीएनजी महागल्यानंतर आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी भाडेवाढीचा आग्रह धरला आहे. माल वाहतूक वाढल्यास त्याचा परिणाम वस्तूंच्या किंमतीवर होईल. नजीकच्या काळात खाद्य तेल, अंडी, मांस, मटण, दुग्धजन्य पदार्थ, इंधनाच्या किंमती वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बातमी : कांद्याची हिस्सार HOS-3 सुधारित जात विकसित
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1