यंदा परतीचा मान्सून वेळेपूर्वी येण्याची शक्यता होती; मात्र वायव्य भारतात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने परतीचा मान्सून आता लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावषीर 6 ऑक्टोबरला मान्सून राजस्थानातून माघारी फिरला होता. यंदा तो सप्टेंबरच्या अखेरीस परतीच्या प्रवासाला निघेल असे संकेत आहेत.
मोठी बातमी : लम्पी स्कीन आजाराचा ने देशात धुमाकूळ : 57 हजार गायींचा मृत्यू
मान्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान तयार झाल्याने यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून राजस्थानातून माघारी फिरच्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र वायव्य भारतात पाऊस सुरू राहण्यासाठी पोषक हवामानान तयार झाल्याने तो तिथेच रेंगाळला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
हे वाचा : भाजप सरकार हे शेतकरी विरोधी : धनंजय मुंडे
राजस्थानातून मॉन्सूनचा प्रवास अद्यापही सुरू झालेला नाही. गतवर्षी 6 ऑक्टोबर रोजी राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केलेला मॉन्सून 25 ऑक्टोबर रोजी देशातून परतल्याने दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. राज्याच्या अनेक भागात अद्यापही जोरदार पाऊस कोसळत असल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
घणाघाती टीका : विजेच्या वाटपात शेतकऱ्यांवर अन्याय : राजू शेट्टी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1