राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली असून, या आठवड्यात त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत कमाल व किमान तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण घटणार असून, हवामान अत्यंत कोरडे राहाणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहाणार आहे.
महत्त्वाची बातमी : उसाच्या रसावर आता 12 टक्के जीएसटी
हवामान अंदाजानुसार महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतावर रविवार ते गुरुवार या कालावधीत 1008 इतका समान हवेचा दाब राहील. शुक्रवारी (7 एप्रिल) हवेच्या दाबात वाढ होऊन तो 1010 हेप्टापास्कल होईल. पुन्हा शनिवारपासून हवेचा दाब 1008 हेप्टापास्कल होईल, तेव्हा वायव्य भारतावरील हवेचा दाब वाढून तो 1012 ते 1014 हेप्टापास्कल होईल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. अरबी समुद्र व हिंदी महासागरावर हवेचा दाब 1008 हेप्टापास्कल राहील.
या आठवड्यात अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके समान राहील. त्यामुळे एल निनोचा परिणाम सध्या राहणार नाही.

दिनांक 4 एप्रिलनंतर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर पश्चिमी चक्रवाताचा परिणाम सुरू होईल. त्याचा परिणाम विदर्भापर्यंत दिसण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच विदर्भातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढून उष्णतेच्या झळा जाणवतील.
हे वाचा : वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या किमती वधारल्या
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल व किमान तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण घटेल. हवामान अत्यंत कोरडे राहील. पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील. धुळे, उस्मानाबाद, बीड, जालना, सोलापूर या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अग्नेय व वायव्येकडून राहील.
कोकण विभागात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत 36 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान 20 ते 21 अंश सेल्सिअस, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत 22 ते 23 अंश सेल्सिअस राहील.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत 83 टक्के, तर ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 73 ते 77 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत 28 ते 29 टक्के राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहील. नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील.
नाशिक, जळगाव जिल्ह्यांत 21 अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात ते 20 अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता 64 टक्के, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत 52 ते 58 टक्के, जळगाव जिल्ह्यात 34 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत 14 ते 17 टक्के इतकी राहील.
ब्रेकिंग न्यूज : पीक नुकसानीची एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार मिळणार मदत
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यांत कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत 39 अंश सेल्सिअस राहील.
बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान 22 अंश सेल्सिअस, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत 23 अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
बीड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता 40 टक्के राहील. जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता 31 ते 33 टक्के राहील.
नांदेड, लातूर व परभणी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता 28 टक्के आणि हिंगोली जिल्ह्यांत 22 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 11 ते 13 टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.

पश्चिम विदर्भ विभागात अकोला, वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, अमरावती जिल्ह्यांत 39 अंश आणि बुलडाणा जिल्ह्यांत 38 अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा जिल्ह्यांत किमान तापमान 22 अंश सेल्सिअस, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत 23 अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता 21 ते 28 टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 12 ते 13 टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील.
मध्य विदर्भ विभागात यवतमाळ जिल्ह्यांत कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत 40 अंश सेल्सिअस राहील. वर्धा, नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान 23 अंश सेल्सिअस, यवतमाळ जिल्ह्यात 24 अंश सेल्सिअस राहील. Weather Update
वर्धा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 22 ते 24 टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता 11 टक्के राहील. वाऱ्याची दिशा अग्नेय व इशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ विभागात भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यांत 42 अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यांत 43 अंश सेल्सिअस राहील. भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान 22 अंश सेल्सिअस, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता 27 ते 30 टक्के राहील. चंद्रपूर जिल्ह्यात 44 टक्के, गडचिरोली जिल्ह्यात 56 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 11 ते 21 टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. राज्यात तापमान वाढीस
मोठी बातमी : कांदा अनुदानासाठी या कालावधीत करावा लागणार अर्ज !
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र विभागात सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यांत 37 अंश सेल्सिअस, कोल्हापूर, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहील.
सातारा जिल्ह्यात किमान तापमान 18 अंश सेल्सिअस, पुणे, सांगली जिल्ह्यांत 20 अंश सेल्सिअस, नगर व कोल्हापूर जिल्ह्यांत 21 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता 70 टक्के राहील.
सातारा, सांगली, पुणे, नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता 50 ते 58 टक्के, सोलापूर जिल्ह्यांत 42 टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील.

कृषी सल्ला :
१) कलिंगड, खरबूज, ऊस, केळी पिकांना ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा.
२) फळबागांवर ८ टक्के केओलीन पावडरची फवारणी करावी.
३) मेथी, कोथिंबीर या पिकांची लागवड करावी.
४) जनावरे, कोंबड्यांना पुरेसे पाणी आणि खाद्य द्यावे. राज्यात तापमान वाढीस
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, दक्षिण आशिया फोरम ऑन ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी)

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1