राज्यातील कृषी क्षेत्राला उभारी देण्याच्या दृष्टीने राज्याच्या कृषिमंत्रिपदी नवा चेहरा दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असलेले राज्याचे कृषिमंत्रिपद नव्या सरकारमध्येही मुख्यमंत्री शिंदे गटाकडे येण्याची दाट शक्यता जाणकारांकडून वर्तविली जाते आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार , एकनाथ शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार दादा भुसे यांचे कॅबिनेट मंत्रिपद यापुढेही तसेच शाबूत राहण्याची शक्यता आहे. मात्र भुसे स्वतः कृषी खात्यापेक्षा ग्रामविकास खात्याला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी युती सरकारच्या काळात उत्कृष्टपणे कामकाज पाहिले आहे. ग्रामविकासामध्ये भुसे यांना चांगला अनुभव तर आहेच शिवाय त्यांना त्यात रसही आहे. त्यामुळे ते कृषी खाते नाकारूही शकतात.

दरम्यान, दुसरे बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर यांना महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद यापुढेही कायम ठेवण्याची शक्यता आहे. कृषिमंत्रिपद भाजपच्या वाट्याला गेल्यास परिषदेच्या उपाध्यक्षपदापेक्षा इतर आणखी चांगले पद आबिटकर यांच्याकडून निवडले जाण्याची शक्यता आहे, अशीदेखील चर्चा आहे. भुसे यांनी नाकारल्यास आबिटकर आन्यथा नवा चेहराही कृषीमंत्री म्हणून पुढे येण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
👇 शेतीमित्र मासिकाचे फेसबुक पेज लाईक करा 👇
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 शेतीमित्र मासिकाचे इन्ट्राग्राम पेज जॉईन करा 👇
https://www.instagram.com/shetimitra03/
👇 शेतीमित्रच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा ! 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटिंग करा
👇 👇 👇