खरीप हंगामाच्या तयारीबाबात कृषी विभागाने राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आपला अहवाला नुकताच सादर केला. या अहवालातून चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील मान्सूनचा पाऊस लांबल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या या अहवालानुसार राज्यात 9 जूनपर्यंत केवळ 5.5 मि.मी पाऊस झाल्याची माहीती समोर आली आहे.
ब्रेकिंग न्यूज : मान्सून जैसे थे ; बिपरजॉयचा धिंगाणा
यंदा मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर साधारणतः 7 जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल झाला. आता बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे. त्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे.
राज्यात मागच्या काही दिवसांपासून पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु अद्यापही मान्सूनचा पाऊस राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात दाखल न झाल्याने बहुतांश जिल्ह्यात उपसाबंदीचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला आहे. यामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग : यंदा खरीप पेरण्या लांबणार ?
दरम्यान, कृषी विभागाने राज्यातील हवामान, उन्हाळी हंगामाची अंतिम पीक परिस्थिती आणि खरीप हंगामाच्या तयारीबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर अहवाल सादर केला आहे. या सादर केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विभागाच्या या साप्ताहिक अहवालानुसार, राज्यात 9 जूनपर्यंत केवळ 5.5 मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. हा पाऊस सरासरीच्या 62.3 मि.मी. इतका म्हणजेच 8.8 टक्के आहे.
दरम्यान मागच्या दोन आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात आकाश कोरडे राहिले आहे. तर राज्यातील कोकण आणि अमरावती या दोन जिल्ह्यात तुरळक हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. .
मोठी घोषणा : बोगस बियाणे विकणाऱ्यांला 10 वर्षांची शिक्षा ; नवा कायदा करणार : कृषीमंत्री
तसेच कोल्हापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ पाऊस झाला आहे. यानंतर अत्यल्प प्रमाणात लातूर, नागपूर विभागात पाऊस झाला आहे. तुरळक पाऊस झाल्याने काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आहे. परंतु पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले असेही अहवालात म्हटले आहे.
राज्यात उसासह खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 15.97 लाख हेक्टर इतके आहे. त्यापैकी केवळ 0.77 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच फक्त 1 टक्का क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.
लक्षवेधी पीक : अशी आहे अननस शेतीची व्यवस्थापन पद्धत
https://www.facebook.com/shetimitramagazine03