कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विशेषत: मुंबई आणि दिल्लीत हा धोका पुन्हा वाढला आहे. मुंबईमध्ये दि. 10 ऑगस्ट रोजी 852 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एक जुलैनंतरची ही सर्वाधिक दैनिक रुग्णसंख्या असून, त्याच दिवशी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूचीही नोंदही झाली आहे.
ब्रेकिंग : पूरग्रस्तांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार
मुंबईत आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11 लाख 29 हजार 285 झाली असून, आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे एकूण 19 हजार 661 जणांचा मृत्यू झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार एक जुलै 2022 रोजी मुंबईत 978 नव्या कोरोनाबाधितांची, तसंच दोघांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईतल्या कोरोनाबाधितांच्या दैनिक नव्या रुग्णसंख्येत हळूहळू घट होत गेली; मात्र ऑगस्ट महिन्याचे पहिले दोन दिवस वगळता नंतर दररोज किमान 400 नवे कोरोनाबाधित मुंबईत आढळत आहेत. 9 ऑगस्टला 476 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 24 तासांत त्या संख्येत 79 टक्के वाढ नोंदवली गेली. 10 ऑगस्ट रोजी 852 नवे कोरोनाबाधित मुंबईत आढळले.
महत्त्वाची बातमी : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे पुन्हा उघडले
10 ऑगस्टच्या या नव्या 852 रुग्णांपैकी केवळ 36 रुग्णांना लक्षणं दिसत असून, 816 जणांना कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. या 24 तासांत मुंबईत 9670 कोरोना चाचण्या केल्या गेल्या. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या एक कोटी 79 लाख 4 हजार 139 एवढी झाली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ नोंदवली जात असल्याचं यावरून दिसून येतं. मुंबईत सध्या सक्रिय (अॅक्टिव्ह) अर्थात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 3545 झाली असल्याचे बृहन्मुंबई महापालिकेच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
ब्रेकिंग न्यूज : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून
दिल्लीतही कोरोनाबाधितांच्या संख्येत, तसेच मृतांच्या संख्येत वाढीचा ट्रेंड दिसत आहे. कोव्हिड-19 मुळे ऑगस्ट महिन्यात दिल्लीत आतापर्यंत 40 मृत्यू झाले आहेत. जुलैच्या अखेरच्या 10 दिवसांच्या तुलनेत मृतांच्या संख्येतली ही जवळपास तिप्पट वाढ आहे. जुलैच्या अखेरच्या 10 दिवसांत 14 जणांचा मृत्यू झाला होता. 10 ऑगस्टला 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, गेल्या 180 दिवसांतला एकाच दिवसातल्या मृत्यूंचा हा सर्वाधिक आकडा आहे. दिल्लीत आतापर्यंत 26 हजार 351 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
ब्रेकिंग न्यूज : अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा
दरम्यान, दिल्लीत कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असले, तरी त्यापैकी बहुतांश रुग्णांना कॅन्सर, टीबी किंवा अन्य आजार होते, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. पुन्हा संसर्ग होणाऱ्यांचे, तसेच लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग होण्याचे प्रमाण गेल्या आठवड्यात जास्त असल्याचे दिसून आल्याचे फोर्टिस हॉस्पिटलच्या सीनिअर कन्सल्टंट रिचा सरीन यांनी सांगितले. हे ओमिक्रॉनच्या BA.2 सबव्हॅरिएंटमुळे असावे, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. वृद्ध, तसेच अन्य आजार असलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, संख्या वाढत असली, तरी पॅनिक होण्याचे कारण नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
लक्षवेधी बातमी : गव्हाच्या किंमती वाढणार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1