सततचा दुष्काळ, गेल्या दोन तीन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट, त्यात अतिवृष्टी, विजेचे भारनियमन आणि मजुरांची टंचाई सुधारित अवजारांचा अभाव ऊस लागवडीच्या हंगामानुसार योग्य उसाची जात निवडीमध्ये त्रुटी उसाच्या बियाण्यामध्ये प्रत्येक पाच ते सहा वर्षांनी बियाणे बदल करणे आवश्यक असून सुद्धा सतत तेच तेच बियाणे वापर व बियाण्याच्या गुणवत्तेकडे होणारे दुर्लक्ष सुधारणा न करता सतत तेच तेच बियाणे वापरल्यामुळे उत्पादनामध्ये होणारी घट कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मधील सभासदांना लागवडीपासून तोडणी पर्यंतचे योग्य असे प्रोग्रॅम आखणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान अशा अनेक कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यामुळे शेती करणे म्हणजे एक अव्हानच झाले आहे. यंदा अतिरिक्त ऊसामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांचे मोठे हाल झाले. त्यामुळे उसाचे क्षेत्र कमी करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र महाराष्ट्रातील शेती विकासामध्ये ऊस हे वरदान ठरलेले आहे; हे लक्षात घ्यायला हवे. अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो. नियोजनातील अभावामुळे ! त्यामुळे ऊस लागवडीतही नियोजन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
हा लेख वाचा : असे करा आडसाली उसाचे खत व्यवस्थापन
ऊस हे शेतकर्यांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठीच वरदान ठरलेला आहे. उसाचे उत्पादन वर्षानूवर्षे चालूच राहणार आहे. ऊसापासून साखरेशिवाय अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार होऊ शकतात. सध्या गुळ, काकवी, मळी, मोलॉसिस, बायोगॅस, सीएनजी, इथेनॉल, स्पिरीड, अल्कोहोल, बायोगॅस, विजनिर्मिती, गुळपावडर, जाम, जेली, चॉकलेट, तीळगुळ, चिक्की आदी पदार्थ आहेत. त्यामुळे ऊस लागवडीत अजूनही चांगला वाव आहे.
ऊस उत्पादक शेतकरी अळशी नाही तर इतर राज्याच्या तुलनेत एकरी उत्पादनात नंबर एकवर आहे. मात्र काळ बदलत चालला आहे; तसा शेतकर्यांनी पिकातही बदल करायला हवा. यंदा राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आता ऊस सोडून दुसरी पिके घ्यावीत असा सूर निघत आहे. आजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पहाता ऊस पिकाखालील क्षेत्र वाढीला मर्यादा असल्या तरी हेक्टरी उत्पादकता वाढविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
आता सुरू, आडसाली आणि पूर्व हंगामी अशा तिन्ही हंगामात ऊसाची लागवड झाली पाहिजे, मात्र तसे होताना दिसत नाही; खरीपातच अडसाली, रब्बी हंगामात पूर्व हंगामी उसाची लागवड होते, मात्र ती जानेवारीनंतर करायला हवी म्हणजे सुरू हंगामी 13 ते 14 महिने ऊस शेतात राहिला तरी मे महिन्यात त्याची तोड करता येते. शिवाय त्याला चांग़ले वजनही मिळते आणि उतारही चांगला पडतो. त्याचा फायदा शेतकर्यांबोरबर कारखान्यांनाही होतो. पूर्व हंगामी ऊसाची लागवड जानेवारी महिन्यात केल्यानंतर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न रहणार नाही. शिवाय अधिक उतार्यासाठी राज्यातील प्रत्येक कारखान्याने उसाचे गाळप हे वाढण्यास मदत होईल व जास्त काळ गाळप दिवस वाढल्यामुळे अर्थातच कारखान्याची ही उत्पादन आणि साखर उतार वाढविण्यासाठी मदत होईल एकूण गळीत क्षेत्राच्या 15 ते 20 टक्के क्षेत्रावर आडसाली, 30 ते 35 टक्के क्षेत्रावर पूर्व हंगामी तर 15 ते 20 टक्के क्षेत्रावर सुरू ऊस लागवड करने गरजचे आहे. उर्वरीत 30 ते 40 टक्के क्षेत्रावर खोडवा ऊस ठेवून उसाच्या पक्वतेनुसार गाळपाचे वेळापत्रक ठरविण्याचे नियोजन केल्यास तोडीवर ताण पडणार नाही.
महत्त्वाची माहिती : जाणून घ्या उसाच्या तूऱ्याचे महत्व
कारखान्यांनी सुचवलेल्या वाणाची लागवड करने व पक्वते नुसार तोडणी हमी घ्यावी
मुख्यत : ऊसाच्या सर्वच वाणांची लागण झाली पाहिजे. सध्या कारखाने को 86032 या वाणाची लागवड करायला लावतात. मात्र शेतकरी इतर वाणांचीही लागवड करतात. ज्या वाणांची अजून शिफारस झालेली नाही, जो अजून प्रसारित केलेला नाही अशा वाणांची लागण केल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा वाणांमध्ये वजन टिकवूण ठेवण्याची क्षमता नसते, त्यामुळे अशा प्रकारचे नवीन वाण लावणार्या शेतकर्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो. मात्र काही नवीन वाणांचे उत्पादकता आणि उतार जास्त आहे. अशा वाणांच्या लागवडीला कारखान्यांनी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्याची हमीही घेतली पाहिजे.
को 86032 ची 30 वर्षाची यशस्वी कारकिर्द
सुधारित जातीमध्ये आडसाली हंगामासाठी शिफारस केलेल्या वाणांमध्ये फुले 265, को 86032 आणि को व्हीएसआय 9805 को 18024 हे वाण चांगले आहेत. पूर्व हंगामासाठी फुले 265, को 86032,एम एस10001 को 94012 को सी 671, व्हीएसआय 8005 को व्हीएसआय 9805 को 9004.आणि व्हीएसआय 434 हे वाण चांगले आहेत. तर सुरू हंगामासाठी फुले 265, को 86032, को 94012, को 92005, को 8014, को सी 671, को व्हीएसआय 9805 आणि व्हीएसआय 434 हे वाण चांगले आहेत. को 18024 या वाणचा जास्त कालावधी साठी व कोईमतूर-9004 या वाणाला तुरा येत नाही. एमएस 10001 हा आपल्याकडे चांगल्या प्रकारे येणारा वाण आहे. याला तूरा येतो मात्र उशीरा तोडणी झाली तरी वजन घटत नाही. मात्र हा ऊस लोळतो त्यामुळे याची लागण केली जात नाही. विशेषत: जानेवारीमध्ये लागण करून तो पुढच्या जनेवारी-फेब्रुवारमध्ये तोडणीला येतो त्यामुळे त्याचे उत्पन्न चांगली भेटते.
महत्त्वाच्या गोष्ट : कमी का येते ? सुरू उसाचे उत्पादन !
कोईमतूर 11015 हा वाण लवकर तोडणीला येतो मात्र याला तुरा येतो. फुले 265 हा वाण कमी नियोजनात चांग़ले उत्पादन देणारा आहे. मात्र यामध्ये वजन टिकवूण ठेवण्याची क्षमता नाही. हा वेळेनंतर तोडणी झाल्यास पोकळ होण्यास सुरूवात होते. को 8005 मध्येही हीच समस्या आहे. मात्र हा वाण अतिशय कठीण आहे. वन्यप्राण्याची समस्या ज्या भागात आहे; अशा भागात हा वाण लावला जातो. हा कठीण असल्याने वन्यप्रण्याकडून कमी प्रमाणात नुकसान होते. या सर्वात को 86032 हा चांगला वाण आहे. यामध्ये वजन टिकवणू ठेवण्याची क्षमता चांगली आहे. 15 ते 20 महिन्यापर्यत फडात राहिला तरी वजन घटत नाही किंवा तूरा येत नाही. विशेष म्हणजे हा सलग 30 वर्षापासून सगळ्यात जास्त कारकिर्द असलेला वाण आहे.
जास्त उत्पादन अन् कमी खर्च हे महत्त्वाचे सूत्र
ऊसाच्या बाबतीत जमिनीचा प्रकार, हवामान, पाण्याची उपलब्धता यावर कमी-जास्त उत्पादन होऊ शकते. आपल्याकडे एकरी 20 पासून 168 टनापर्यंत उसाचे उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. योग्य नियोजन,अचुक सल्ला व मार्गदर्शन आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे उत्पादन वाढलेले आहे. काही शेतकर्यांचे उत्पादन कमी निघत असेल तर ते त्यांची आर्थिक परिस्थितीमुळे तर काहीं शेतकर्यांची इतर व्यवसायात किंवा कामानिमित्त अथवा मजुरीसाठी इतरत्र अडकल्यामुळे शेतीमध्ये कष्ट करण्याची तयार नाही त्यामुळे सगळेच ऊस उत्पादक शेतकरी अळशी आहेत असे होत नाही. एकरी उत्पादनात महाराष्ट्र एक नंबरवर आहे. इतर राज्यात फारच कमी उत्पादन निघते. मात्र आता शेतकर्यांनी नवीन बदल स्विकारला पाहिजे. येणार्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी नव्या गोष्टींचा स्विकार करण्याची गरज निर्माण झाली आहे. अवजाच्या उपलब्धतेनुसार आता पिकातील अंतर वाढवायला हवे. सेंद्रिय आणि जीवाणू खताचा वापर करायला हवा. केवळ उत्पादन वाढवून उपयोग नाही तर खर्च कमी करून जास्त उत्पादनाचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाचनीय लेख : सुरू ऊसातील आंतरपिके
ऊस उत्पादन वाढीसाठी चांगले रोग मुक्त व विद्यापीठातील नवीन तसेच टिशू कल्चर मूलभूत बियाणे फाउंडेशन बियाणे पायाभूत बियाणे याचा वापर कारखाना स्तरावरून किंवा स्वतः बेणे मळा तयार करून वापर करणे ही काळाची गरज आहे शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी व लागवड हंगाम साधून तूटाळी विरहित क्षेत्र करण्यासाठी तयार रोपांचा लागवडीचा पर्याय निवडणे ही काळाची गरज आहे तयार रोपांमुळे सुरुवातीच्या होणाऱ्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते व एकंदर ऊस उत्पादनात खर्चावर बचत होते व उत्पादन खर्च कमी येतो त्यामुळे एकंदर फायदा शेतकऱ्यांना झालेला दिसून आलेला आहे या अत्याधुनिक तंत्राचा वापर अनेक शेतकऱ्यांनी केला आहे त्यासाठी दर्जेदार रोपे मिळण्याकरता पूर्वनियोजित बुकिंग नुसार रोपे तयार करून घेणे शेतकऱ्यांना फायद्याची ठरते
फेरपालट आणि सेंद्रिय कर्बा वाढविण्यावर भर
यशस्वी ऊस उत्पादनासाठी आता ऊसानंतर फेरपालट करण्याची गरज आहे. लागण व खोडवा घेतल्यानंतर कापूस, सोयाबीन, मूग, हरभरा अशी अनुभवातील पिके घेतली पाहिजेत. अनुभव नसलेली पिके न घेतलेली चांगली. भाजीपाल्यात चांगला अनुभव असेल तरच भाजीपाल्याचा विचार करावा. आडसाली, पूर्व हंगामी ऊसामध्ये कमी उंचीची व कमी कालावधीची अंतरपिके घ्यावीत. रासायनिक खताचा अतिरिक्त वापर कमी करावा. उसाला खर्या अर्थाने सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक अशी एकात्मिक उन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे. हे लक्षात घेवून व्यवस्थापन करावे. उसाच्या फडातून निघणारे पाचट शेतात गाडून शेतातील सेंद्रिय घटक आणि सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रयत्नातून शेतातल्या शेतातच खताचा खर्च कमी करावा लागणार आहे. पिकवाढीसाठी जसे आपण सर्व घटकांचे एकत्रित वापर करतो तसेच त्या पीकतला लागणारा कीड-रोगावर काळजीपूर्वक लक्ष द्यावे. व त्याच्यावरील उपाय योजना कराव्यात हेसुद्धा ऊस उत्पादन वाढीचे तंत्र आणि नियोजनाचाच भाग आहे
राहुल कुबेर भोकरे कसबे डिग्रज ता. मिरज जि. सांगली मोबा. 7875709675 / 8208363085
महत्त्वाच्या टिप्स : असे करा आडसाली ऊस लागवडीचे नियोजन
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1