अनेक शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. तर यासाठी गाय-म्हशींचे पालन करतात. तसेच कोणत्या म्हशीच्या जातीचे पालन करून अधिक उत्पन्न मिळवता येईल या शोधात असतात. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने म्हशींच्या मराठवाडी, पंढरपुरी आणि नागपूरी या तीन जातीचे पालन केले जाते. यातील पंढरपुरी या जातीचे पालन तर काटक तसेच दुधासाठी केले जाते.
फायद्याची गोष्ट : या आहेत भारतातील टॉप 5 गायी
पंढरपुरी म्हैस ही एक भारतीय म्हशीची जात आहे. पंढरपुरी ही सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. या जातीच्या म्हशी मध्यम आकाराच्या असून, यांचा चेहरा लांब आणि निमुळता असतो. सोलापूर जिल्यातील पंढरपूर तालुका हे तीचे मूळ गाव आहे. या तालुक्यावरूनच तिला पंढरपुरी हे नाव पडले आहे. पंढरपुरी म्हैस महाराष्ट्रतील सोलापूरबरोबरच कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातही आढळून येत असल्याने तिला धारवाडी असेही म्हंटले जाते.
महत्त्वाची माहिती : जागतीक स्थरावर का चर्चेत आहे, भारतीय गीर गाय ?
पंढरपुरी म्हैस कडक उन्हात, कमी पावसाच्या प्रदेशात, निकृष्ट चाऱ्यावर तग धरून राहणारी काटक अशी जात आहे. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे या म्हशींची शिंगे 45 ते 50 सेंटीमीटर पर्यंत वाढलेली आणि अगदी खांद्यापर्यंत आलेली असतात. तलवारीच्या आकाराची व लंबुळकी-पिळदार शिंगे आणि त्यांच्या शरीराच्या ठेवणीमुळे या म्हशी देशभरात प्रसिद्ध आहे. या म्हशीचे वजन 450 ते 500 किलो इतके असते. दुधाचे उत्पादन 6 ते 7 लिटर इतके असते. उत्तम व्यवस्थापनात दुधाचे उत्पादन 15 ते 18 लिटर पर्यंत जाऊ शकते.
मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताच्या वेळी कमी वय, उत्तम प्रजनन, दुग्धोत्पादनक्षमता आणि सातत्य यासर्व गुणांमुळे ही जात दुधासाठी चांगली आहे आणि तिला मागणीही जास्त आहे. चांगले व्यावस्थापन केल्यास एका वेतातील दूध उत्पादन 1500 ते 1800 लिटरपर्यंत मिळते. या जातीचे रेडे ओढकामासाठी व शेतीच्या कामासाठी वापरले जातात.
हे नक्की वाचा : खिल्लार या गोवंशाला का म्हणतात पांढरे सोने ?
अधिक उत्पादन क्षमतेमुळे म्हैस बाकीच्या जनावरांपेक्षा फायद्याची ठरते. तिच्या दुधामध्ये स्निग्धाचे प्रमाण जास्त असून तूस, कुठार यांसारख्या शेतातल्या उरलेल्या अवशेषांवर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचे खाद्य बनवून म्हशींना देता येते. दुग्ध व्यवसायासाठी उपयुक्त असणारी ही पंढरपुरी म्हैस हलक्या आणि निकृष्ट चाऱ्यावर सुद्धा तग धरून राहू शकते. जवळजवळ सर्व प्रकच्या वातावरणात ही जात चांगले दूध देते.
महत्त्वाची माहिती : शाश्वत शेतीसाठी गोमाता एक वरदान
या म्हशीच्या पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात. 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. दर 12 ते 13 महिन्यात या जातीच्या म्हशी एका पारड्याला जन्म देतात. त्यानंतर साधारण तीन ते पाच दिवसांपर्यंत दूध देण्याची क्षमता या म्हशीमध्ये आहे. बाकी सर्व देखरेख आणि सांभाळ हा इतर जनावरांसारखाच असल्याने विशेष असे लक्ष या म्हशींना द्यावे लागत नाही. लवकर गाभण राहणे, कमी भाकड काळ आणि चांगली प्रजनन क्षमता असणाऱ्या या पंढरपुरी म्हशीचे उत्तम व्यवस्थापन केल्यास नक्कीच दुग्ध व्यवसायात फायदा होईल. या म्हशींच्या व्यवस्थापनाबाबत अधिक माहितीसाठी प्रमुख, सर्व समावेशक पंढरपुरी म्हैस सुधार प्रकल्प, कोल्हापूर (0231-2692416) या ठिकाणी संपर्क साधावा.
नक्की वाचा : मराठवाडा भूषण म्हणणारी ‘देवणी’ गाय आहे तरी कशी ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1