गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. असे असले 31 तारखेनंतर 14 राज्यांतील पेट्रोल पंप डीलर्सनी घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत भडका उडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आनंदाची बातमी : 31 मे रोजी पीएम किसानचे पैसे येणार खात्यात
देशाच्या राजधानीसह 14 राज्यांतील पेट्रोल पंप डीलर्सनी 31 मे 2022 पासून सरकारी तेल कंपन्यांच्या तेल डेपोतून पेट्रोल आणि डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 31 मे रोजी देशभरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलची टंचाई जाणवू शकते. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या टंचाईमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

महत्त्वाची बातमी : येवला येथे 15 जून रोजी होणार कांदा परिषद
2017 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील कमिशनमध्ये वाढ करण्यात आली नसल्याचे पंप मालकांचे म्हणणे आहे. पंपमालकांनी आपल्या मागण्यांबाबत सरकारवर दबाव आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसणार आहे.
महाराष्ट्रात पेट्रोलने कधीच शंभरी पार केली आहे. डिझेल देखील राज्यात शंभरीच्या जवळ तर काही ठिकाणी शंभरी पार विकले जात आहे. यामुळे 31 तारखेला जर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवली तर निश्चितच पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत भडका उडणार आहे. यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेस मोठा धक्का बसणार आहे. मध्यमवर्गीय लोकांचे यामुळे बजेट कोलमडणार असल्याची भिती आता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा : मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचा किसान सभेचा इशारा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1