राज्यात काही जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरु असून, दिवाळीच्या तोंडावरची पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे येत्या दोन दिवसात गुलाबी थंडी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत गुलाबी थंडीबरोबर पाऊसही दिसणार असे चिन्ह आहे.
मोठी बातमी : सिल्लोडमध्ये कृषी औद्योगिक पार्क उभारणार : उद्योगमंत्री सामंत
यंदा परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास 10 दिवस सततच्या पावसानंतर आता मान्सूनने निरोप घेतला असला तरी, आज जाता-जाता पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. मात्र आताही काही राज्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.
स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्री वाऱ्यांचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये अजूनही पावसाची शक्यता आहे. तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक राज्यांतही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ब्रेकिंग न्यूज : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ; उद्यापासून उघडीपीची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार तामिळनाडू आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. यामुळे आयएमडीने येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या ताज्या अहवालानुसार मान्सूनने देशाचा निम्मा भाग सोडला आहे. IMD नुसार, जम्मू-काश्मीर, हिमाचल, पंजाब हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, सिक्कीम, आसाम, मेघालय, त्रिपुरा येथून मान्सून परतला आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परतेल असा अंदाज आहे.
दरम्यान, गहू लागवड करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण लवकरच गव्हाला पोषक असणारी थंडी सुरु होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, थंडी 18-20 च्या दरम्यान सुरु होईल. मात्र 20 ऑक्टोबरनंतर उत्तर भारतात गुलाबी थंडीचा प्रभाव दिसून येईल. तापमान कमी होईल आणि धुके असेल, असाही अंदाज वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या टिप्स : जनावरांमधील घातक लम्पी स्कीन रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1