महाराष्ट्र राज्य सरकारने जमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामुळे शेत जमीन मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता जमीन खरेदी-विक्रीचे अधर्वट राहिलेले व्यवहार पूर्ण करता येणार आहेत.
या नवीन महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतीसाठी तुकडेबंदी कायद्यात जे काही निश्चित केलेले प्रमाणभूत क्षेत्र होते ते आता कमी करण्यात आले आहे. जर आपण पूर्वीच्या तुकडेबंदी कायद्याचा विचार केला तर यामध्ये प्रत्येक तालुक्यानुसार प्रमाणभूत क्षेत्र हे निश्चित करण्यात आलेले होते. परंतु आता यामध्ये संपूर्ण राज्यासाठी एकच समान प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिरायत जमीन कमीत कमी 20 गुंठे आणि बागायत जमीन हे 10 गुंठे खरेदी करता येणार आहे.
ब्रेकिंग न्यूज : कृषी विभागाचा 60 टक्के निधी शिल्लक ; शेतकरी योजनांपासून वंचित
राज्य शासनाने तुकडेबंदी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला परंतु यामध्ये विशेष लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हा निर्णय महानगरपालिका व नगरपालिका हद्दीसाठी लागू असणार नसल्याचे देखील अधीसूचनामध्ये म्हटले आहे. म्हणजे या अधिसूचनेनुसार फक्त ग्रामीण भागातील शेतजमीनसाठी हा निर्णय असणार आहे.
हे वाचा : स्कायमेट : यंदाही सरासरीपेक्षा अधिक होणार पाऊस
सरकारने शेतकऱ्यांसाठी जे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले होते हे क्षेत्र कमी करण्याच्या विषयी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. एवढेच नाही तर जिल्हा सल्लागार समित्यासोबत विचार मंथन करून सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे आदेश राज्य सरकारचे उपसचिव संजय बनकर यांनी काढले आहेत.
महत्त्वाच्या गोष्ट : शेतीमध्ये फळमाशीचा धोका वाढतोय !
राज्य शासनाने जो काही हा निर्णय घेतला आहे. यावर शासनाने नागरिकांकडून काही हरकती असतील, काही सूचना असतील त्या देखील मागवल्या आहेत. ज्या कोणाला या हरकती किंवा सूचना मांडायचे असतील ते अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) मंत्रालय मुंबई 400032 यांच्याकडे दाखल करू शकणार आहेत.
अतिमहत्वाची बातमी : मॉन्सून उद्यापर्यंत अंदमानात तर २७ मे पर्यंत केरळात
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1