सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसात सर्या जगावर पडत असून, आंतरराष्ट्रीय बाजारावर त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम दिसून येवू लागले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून क्रुड ऑईल बरोबरच पेट्रोल डिझेलचे दर उच्चांकी वाढले आहेत. दरम्यान, भारतात गेल्या चार महिन्यापासून काही राज्यातील निवडणूकीवर पेट्रोल डिझेल दरवाढीचा परिणाम मतदारावर आणि मतदानावर होवू नये म्हणून केंद्र सरकारने मोठा कसरतीचे रोखून ठेवलेले दर उद्याच्या निवडणूक निकालानंतर अचानक वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यापाठोपाठच महागाईचा भडका होण्याची शक्यात तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर हे गगनाला पोहोचले आहेत. परंतु गेल्या चार महिन्यांपासून भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल मध्ये दरवाढ झालेले नाही. परंतु आता ही परिस्थिती संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. जर मध्यंतरी कालावधीचा विचार केला तर पेट्रोलचे भाव जवळ शंभर रुपयाच्या वरती गेली तेव्हा देशभर संतापाचे वातावरण तयार झाली होती. त्यानंतर केंद्र सरकारने भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये उत्पादन शुल्क कमी केले होते, त्यामुळे त्या राज्यात पेट्रोलच्या किमती शंभरच्या आत-बाहेर होत्या. शिवाय उत्तर प्रदेश राज्यांमध्ये निवडणुकीचा काळ असल्याने जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, मतदारांच्या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी गेल्या चार महिन्यांपासून इंधन दरवाढ सरकारने थोपवून धरली होती. परंतु आता उद्या या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे युद्धाचे कारण पुढे करून इंधन दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या क्षेत्रातील तज्ञ आणि विश्लेषक यांच्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत लिटरमागे पंधरा रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. जर 2017 या वर्षाचा विचार केला तर तेव्हापासून खनिज तेलाच्या किमतींचा आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार ताळमेळ घालण्यात येतो. मागच्या वर्षी 4 नोव्हेंबर 2021 पासून किमती स्थिर आहेत. लोकांचा रोष कमी होण्यासाठी आणि निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का पोहोचू नये यासाठी सरकारने ही तारेवरची कसरत केली होती.
पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण सेलच्या माहितीनुसार भारताने खरेदी केलेल्या तेलामध्ये एक मार्च रोजी 111 डॉलर प्रती बॅरलची वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने केलेला आटोकाट प्रयत्न यापुढे टिकाव धरणार नाही, हे स्पष्ट आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारत हा इंधनासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. जर देशातील एकूण इंधन मागणीचा विचार केला तर 85% मागणीही पूर्ण करण्यासाठी विदेशातून पुरवठा होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात वाढ झाली तर सरकार जास्त वेळ या भाववाढीचा भार सहन करू शकत नाही.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
शेवग्याची छाटणी करून मिळवा भरपूर शेंगा
येत्या 5 दिवसात या जिल्ह्यात पावसाचा अंदाज
अशी बनवा परसबागेलाच न्युट्रीशनल गार्डन
लाला मिरचीला विक्रमी दर ; उत्पदकता मात्र ढासळली
तसेच रुपयाची घसरण हा देखील एक चिंतेचा विषय असून या दोन्ही गोष्टींचा फटका देखील अर्थव्यवस्थेला बसण्याची दाट शक्यता आहे. सध्या खनिज तेलाचे भाव 130 डॉलर प्रती बॅरल इतके झाले आहेत. जर या भावाचा विचार केला तर जुलै 2008 मध्ये खनिज तेल या किमतीवर होते. त्यानंतर तेरा वर्षांनी खनिज तेलाच्या किमतीमध्ये एवढी उच्चतम वाढ झाली आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇













Users Today : 19
Users Last 30 days : 772
Users This Month : 97
Users This Year : 809
Total Users : 236258