शेतीच्या मशागतीच्या खर्चाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा शासनाच्या टॅक्टर अनुदान योजनेतून राज्यातील सुमारे 25 हजार शेतकऱ्यांना 50 % अनुदानावर टॅक्टर मिळणार आहे. यासंदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग : यंदा मान्सून केरळकडून येणार नाही : पंजाबराव डख
इंधनाच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचा शेती मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या टॅक्टर अनुदान योजनेतून टॅक्टर मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. राज्यातील 15 लाख 29 हजार शेतकऱ्यांनी अनुदानातून टॅक्टर मिळण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत. मात्र राज्य शासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने 2023-24 या वर्षात राज्यातील 25 हजार शतकऱ्यांना ट्रॅक्टर योजनेसाठी अनुदान देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत असून, कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी महा-डिबीटी पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची योजना जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कृषी अवजारांवर / यंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. पुष्कळ शेतकरी असे आहेत जे अजून पारंपरिक पद्धतीने शेती करतात अशा पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या शेतीला पुष्कळ वेळ लागतो म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांची शेती विषयक कामे आधुनिक पद्धतीने आणि अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
शुभवार्ता : मान्सून केरळात दाखल
शेतीकामांसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा वापर सुरू केल्यामुळे पुढील काही काळात बैल जोडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने राज्यातील 15 हजार शेतकऱ्यांना अनुदानातून ट्रॅक्टर दिले आहेत. शासनाच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखांची तर मागासवर्गीय, दिव्यांग, महिला, अल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वालाख रुपयांची सबसिडी दिली जाते.
उर्वरित पैसे हप्त्याने संबंधित ट्रॅक्टर कंपनीला शेतकरी भरतात. खताबरोबरच आता शेती मशागतीचा खर्च महागला आहे. भाड्याच्या ट्रॅक्टरला नांगरणीसाठी एकरी बावीसशे रुपये, तर कोळपणी, फणासाठी दीड हजार रुपये मोजावे लागतात. स्वत:चाच ट्रॅक्टर असल्यास तेवढा खर्च होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर खरेदीकडे वाढला आहे.
त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. आता ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून अर्जदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे. ट्रॅक्टर हे कमी वेळेत जास्त काम करून देणारे यंत्र आहे. यामुळे वेळेची व श्रमाची बचत होते. तसेच ट्रॅक्टरला शेतीसाठी लागणारी अनेक प्रकारची यंत्रे जोडता येतात.
यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर सोयीस्कर पडतो. तसेच शेतीच्या कामासाठी मजूर न मिळण्याच्या समस्येवर देखील ट्रॅक्टर उत्तम उपाय आहे. सध्या ट्रॅक्टरच्या मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत.
मान्सून अपडेट्स : चिंता वाढली : मान्सून अजून लांबणीवर
https://www.facebook.com/shetimitramagazine03